Sameer Wankhede Controversy Dainik Gomantak
मनोरंजन

Sameer Wankhede Controversy : "18 कोटीचे डील अन् 50 लाख अ‍ॅडव्हान्स" शाहरुखच्या मॅनेजरचा जबाब वानखेडेंची अडचण वाढवणार...

Rahul sadolikar

CBI चे गंभीर आरोप

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव समोर आल्याने आणि त्याच्या अटकेनंतर क्रूझ ड्रग्ज प्रकरणात खळबळ उडाली. आता दोन वर्षांनंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. 

या संपूर्ण प्रकरणात आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे तत्कालीन झोनल हेड समीर वानखेडे हेच चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. सध्या आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

वानखेडेंसाठी पूजा ठरली डोकेदुखी

विशेष म्हणजे यात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांचे जुने विधान समीर वानखेडेसाठी सर्वात मोठी अडचण ठरले आहे. पूजाचे हे विधान गेल्या वर्षी १६ जून रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या दक्षता अहवालाचा भाग होता. 

या आधारे CBI ने 2021 च्या कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे आणि इतर चार जणांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याचाही समावेश आहे.

50 लाख रुपयांची बॅग दिली होती

पूजा ददलानीने तिच्या रेकॉर्ड केलेल्या जबानीत कथित खंडणी स्वीकारली आहे. या प्रकरणात त्याने टोकन मनी म्हणून 50 लाख रुपयांची बॅग दिल्याचेही सांगण्यात येत आहे. इतकेच काय, हे सर्व कॉर्डेलिया क्रूझच्या छाप्याच्या काही तासांनंतरच घडले. 

एनसीबीच्या तपासानुसार, या प्रकरणात आर्यन खानचे नाव समोर आले तेव्हा अधिकाऱ्याकडून 25 कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती. मात्र नंतर 18 कोटी रुपयांत सौदा ठरला. त्यासाठी टोकन मनी म्हणून ५० लाख रुपयेही देण्यात आले.

पूजाचे समन्सकडे दुर्लक्ष

यापूर्वी, 3 ऑक्टोबर 2021 रोजी, या प्रकरणातील मुख्य दुवा असलेल्या पूजा ददलानीने तिची जबानी नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या किमान तीन समन्सकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर या समीर वानखेडेविरुद्धचा पोलीस तपास बंद करावा लागला.

पूजासह आणखी काही जणांचे जबाब

'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार तपासात सहभागी असलेल्या एका प्रमुख अधिकाऱ्याचा संदर्भ देऊन म्हटले आहे की, "दक्षता पथकाने गेल्या वर्षी पूजा ददलानीशी संपर्क साधला, त्यानंतर तिने खंडणीच्या आरोपांबाबत तिचे म्हणणे नोंदवले." पूजाशिवाय केपी गोसावी, सॅनविले डिसोझा आणि प्रभाकर साईल (साक्षीदार) यांचेही जबाब आम्ही नोंदवले.

शाहरुखकडून लाच घ्यायची होती

या अधिकाऱ्याला पूजा ददलानीने तिच्या वक्तव्यात काय म्हटले आहे, असे विचारले असता, त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. तथापि, ते पुढे म्हणाले की, सर्व विधानांच्या आधारे असा निष्कर्ष काढण्यात आला की शाहरुख खानकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT