Narendra Modi  Dainik Gomantak
मनोरंजन

मोदींनाही आवडला 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट; टीमची भेट घेऊन केले अभिनंदन

'द काश्मीर फाइल्सचे' निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी पीएम मोदींसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

दैनिक गोमन्तक

'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटाचे सर्वजण कौतुक करत आहेत. केवळ जनतेलाच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हा चित्रपट आवडला आहे. मोदींनी चित्रपटाच्या टीमची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

'द काश्मीर फाइल्सचे' निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी पीएम मोदींसोबतचे फोटो शेअर केले आहेत. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी फोटो (Photo) शेअर करत लिहिले- 'मला खूप आनंद होत आहे की अभिषेकने सत्य दाखवण्याचे धाडस केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल जगाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी USA मधील #TheKashmirFiles चे स्क्रीनिंग फायदेशीर ठरले.

मोदींना चित्रपट आवडला, तर निर्माता अभिषेक अग्रवाल यांनी पंतप्रधानांसोबतचे फोटो शेअर केले आणि लिहिले – 'आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना भेटणे हा एक सुखद अनुभव होता. याआधी चित्रपटाची निर्मिती करताना आम्हाला इतका अभिमान वाटला नव्हता. धन्यवाद मोदीजी...'

व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी 'द काश्मीर फाइल्सच्या' पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस (Box Office) कलेक्शन शेअर केले आहे.'#TheKashmirFiles ने पहिल्या दिवशी एक मोठं सरप्राईज दिलं...मर्यादित स्क्रीन असूनही दिवसाअखेरीस चित्रपटाची जादू सिनेरसिकांवर होतांना दिसत आहे. दुसऱ्या आणि तिसर्‍या दिवशी संध्याकाळ आणि रात्रीचे शो एक्स्ट्रा-ऑर्ड‍िनरी होते.. या कमाईत प्रचंड वाढ होईल हे नक्की. आज शुक्रवारी 3.55कोटींची कमाई या चित्रपटाने (Movie) केली आहे #India' अशी पोस्ट तरण आदर्श यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cruise Tourism: क्रूझवरुन गोव्यात 67,594 प्रवासी, 9 महिन्यांत कमावलं 4.82 कोटींचं उत्पन्न; मुरगाव बंदर बनलं क्रूझ पर्यटनाचं केंद्र

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

The Hundred League: 13 चेंडूत 50 धावा...! लियम लिविंगस्टन-जेकब बेथेल जोडीने मोडला 136 वर्ष जुना रेकॉर्ड; ‘द हंड्रेड’मध्ये केला मोठा धमाका

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

SCROLL FOR NEXT