Pathan Movie Controversy Dainik Gomantak
मनोरंजन

Pathan Movie : मध्यप्रदेशात बजरंग दलाने पठाणचे पोस्टर पेटवले, चित्रपट धर्मविरोधी असल्याचे सांगत शो बंद पाडले..

शाहरुख खानचा पठाण पहिल्याच दिवशी सुपरहिट ठरला असला तरी काही ठिकाणी अजुनही विरोध सुरू आहे.

Rahul sadolikar

Pathan Movie Controversy: शाहरुख खानचा पठाण चित्रपट अनेक वाद-विवादानंतर आज (25 जानेवारी) रिलीज झाला ;पण तरीही पठाणला होत असलेला विरोध काही केल्या थांबायला तयार नाही. आज हा चित्रपट जगभरात रिलीज झाला.

सेन्सॉरने जरी चित्रपटाला हिरवा कंदिल दाखवला असला तरी काही संघटनांचा पठाणला असणारा विरोध अजुनही कायम असल्याचं दिसतंय. मध्यप्रदेशमध्ये काही ठिकाणी पठाणला हिंसक विरोध झाल्याचं चित्र आहे.

 मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करत असून मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपटाचे शो बंद केले जात आहेत. इंदूर, बरवानी, ग्वाल्हेरमध्ये या चित्रपटाविराधात जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत.

बुधवारी हा चित्रपट इंदूरमधील 12 हून अधिक मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला, परंतु बजरंग दलाचे कार्यकर्ते पहिल्याच शोमध्ये प्रेक्षकांसमोर पोहोचले. देशद्रोही चित्रपट चालू देऊ नका अशा घोषणा देत चित्रपटाचा पहिला शो रद्द केला.

 प्रेक्षकांनी शाहरुख खानचा चित्रपट न पाहण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांनी केले. बजरंग दलाचे कार्यकर्ते हातात लाठ्या घेऊन आले होते.

त्यांनी मल्टिप्लेक्स चालकांवर दबाव आणला आणि सांगितले की, शो चालवला तर आतमध्ये आंदोलन करू. मल्टिप्लेक्स चालकांच्या आश्वासनानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते तेथून परतले.

'पठाण' विरोधात ग्वाल्हेरमध्येही असाच निषेध करण्यात आला. बजरंग दलाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रॅली काढली त्यानंतर ते शहरातील डीडी मॉलमध्ये पोहोचले, तिथे कार्यकर्त्यांनी थिएटरमध्ये पठाण चित्रपट बंद करा असा इशारा दिला.

कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शहरातील कोणत्याही सिनेमागृहात चित्रपट चालू न देण्याचा इशारा दिला. 

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी राजधानी भोपाळमध्ये पठाण चित्रपटाला विरोध केला.कार्यकर्ते  कामगार रंगमहल टॉकीजवर पोहोचले आणि त्यांनी बाहेर धरणे आंदोलन सुरू केले.

एवढेच नाही तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तिकीट काउंटरवर पोहोचून हनुमान चालिसाचे पठण केले आणि घोषणाबाजी करत निषेध केला.

हा चित्रपट न पाहण्याचे आवाहन करत या संघटनेने पठाण चित्रपट धर्मविरोधी असल्याचे म्हटले आहे.चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बरवानीमध्ये जोरदार निदर्शने झाली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारीच चित्रपटगृहात पोहोचून चित्रपटाचे पोस्टर फाडून पेटवून दिले. 

बजरंग दलाच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहांबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बजरंग दल आणि हिंदू संघटनांचे लोक चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याला विरोध करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT