Pathaan Box Office
Pathaan Box Office Dainik Gomantak
मनोरंजन

Pathaan Box Office: काश्मीर खोऱ्यात 32 वर्षानंतर चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलची पाटी

दैनिक गोमन्तक

Pathaan Box Office: पठाण चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होण्याआधीपासूनच चित्रपट मोठ्या चर्चेत होता.आता शाहरुखच्या चाहत्यांनी पठाणला मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.

पठाण बॉक्सऑफीसवर मोठी कमाई करत असून पठाणची सगळीकडे चर्चा सुरु आहे. महत्वाची बाब म्हणजे पठाणने काश्मीर( Kashmir )च्या खोऱ्यातही आपली कमाल दाखवली आहे.

तब्बल 32 वर्षानंतर काश्मीर खोऱ्यातले चित्रपटगृह हाऊसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. INOX च्या अधिकृत हँडलवरून ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे.

INOX Leisure Ltd ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आज देशात पठाणमुळे 32 वर्षांनंतर काश्मीर खोऱ्यात हाऊसफुलचा बहुमोल चिन्ह परत आणल्याबद्दल आम्ही किंग खानचे आभारी आहोत. धन्यवाद शाहरुख खान.

दरम्यान, शाहरुख खान( Shahrukh Khan ) 4 वर्षानंतर पडद्यावर परतला आहे. चाहते किंग खानच्या चित्रपटाच्या प्रतिक्षेत होते. पहिल्याच दिवशी जगभरात एकूण 106 कोटींची कमाई केल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.

यशराज फिल्म्स (YRF) च्या मते, चित्रपटाच्या ओपनिंग डेची कमाई देशांतर्गत 55 कोटी रुपये होती,जी त्यांच्या मते हिंदी चित्रपटासाठी सर्वात जास्त ओपनिंग डे कलेक्शन आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT