Pankaj Tripathi Dainik Gomantak
मनोरंजन

Pankaj Tripathi: '...त्यानंतर मी गुंडांचा आदर्श बनलो होतो' पंकज त्रिपाठींनी सांगितला 'गँग्स ऑफ वासेपूर' नंतरचा अनुभव

Pankaj Tripathi: त्यानंतर अनेक लेखक, जे मला कथा सांगायला येत होते, त्यांना भीती वाटत होती की कोणत्याही क्षणी मी खिशातून चाकू काढेन.

दैनिक गोमन्तक

Pankaj Tripathi: अनेक कलाकृतींना मरण नसते, त्याचबरोबर काही चित्रपट हे दीर्घकाळासाठी लक्षात राहतात. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे 'गँग्स ऑफ वासेपूर' हा आहे. यातील अनेक पात्रे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. सुलतान कुरेशीच्या भूमिकेत पंकज त्रिपाठीलाही खूप आवडले होते. लोकांनी त्याचे खूप कौतुक केले. आता एका मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांनी प्रेक्षकांनी तर कौतुक केलेच मात्र त्याबरोबरच हा चित्रपट पाहिल्यानंतर एका गँगस्टरने संपर्क साधल्याचा प्रसंग सांगितला आहे.

पंकज त्रिपाठी यांना विचारण्यात आले की, तो चित्रपट पाहिल्यानंतर गुंडांनी त्यांच्याशी संपर्क साधल्याची अफवा पसरली होती. या प्रश्नावर अभिनेत्याने होकार दिला आणि सांगितले, 'त्यावेळी उत्तर आणि दक्षिण भारतातील अनेक गुंड मला त्यांचा आदर्श मानू लागले. सुलतान चित्रपटात जे सांगतो ते करतो आणि चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखाही चांगली आहे, असा त्यांचा विश्वास होता. लोकांना सुलतान खूप आवडू लागला होता. त्यानंतर अनेक लेखक, जे मला कथा सांगायला येत होते, त्यांना भीती वाटत होती की कोणत्याही क्षणी मी खिशातून चाकू काढेन.

अभिनेत्याने खुलासा केला की जेव्हा त्याला गँग्स ऑफ वासेपूरमध्ये सुलतानच्या भूमिकेची ऑफर आली तेव्हा तो टीव्ही मालिकेसाठी शूटिंग करत होता. त्यानंतर त्याने त्याच्या शोच्या निर्मात्यांना शेड्यूल मागे घेण्यास सांगितले. पण जेव्हा निर्माते सहमत नव्हते तेव्हा पंकज त्रिपाठींनी शो सोडला आणि अनुराग कश्यपचा चित्रपट केला. 2012 मध्ये आलेला हा सिनेमा दोन भागात रिलीज झाला होता. दोन्ही भागांचे खूप कौतुक झाले. या नावाजलेल्या चित्रपटात मनोज बाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, रिचा चढ्ढा, हुमा कुरेशी असे अनेक स्टार्स होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT