Pankaj Tripathi Dainik Gomantak
मनोरंजन

Pankaj Tripathi : या अभिनेत्याने गावच्या शाळेत बसवले सोलर पॅनल...मातीची नाळ जपणारा कलाकार

अभिनेते पंकज त्रिपाठी मातीशी जोडलेला कलाकार का म्हणतात हे त्यांनी सिद्ध केले आहे..

Rahul sadolikar

मिर्जापूरसारख्या वेबसिरीजमधुन कालीन भैय्या हे पात्र जिवंत करणारे अभिनेते पंकज त्रिपाठी यांचा संघर्ष त्यांचा चाहत्यांना चांगलाच माहित आहे. अगदी हॉटेल मध्ये रूम सर्विसचं काम करण्यापासुन ते एक यशस्वी वास्तववादी अभिनेता हा त्यांचा प्रवास सोपा मुळीच नव्हता.

आपला संघर्ष इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणुन पंकज त्रिपाठींची धडपड सुरू असते. बेलसंड या त्यांच्या मूळ गावीही त्यांचं विशेष लक्ष असतं. आता गावातल्या शाळेसाठी त्यांनी सोलर सिस्टिम बसवली आहे.

गावातल्या शाळेत बसवले सोलर पॅनल

जेव्हा जेव्हा त्याची बिझी शेड्यूलमधुन वेळ मिळतो तेव्हा पंकज त्रिपाठी शहराची गजबज सोडून गोपालगंज जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी, बेलसंड येथे काही दिवस शांततेत घालवतात. गेल्या काही वर्षांत, पंकज त्रिपाठींनी आपल्या गावच्या सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आता, त्रिपाठी यांनी त्यांच्या अल्मा माटर हायस्कूल ऑफ बेलसँडच्या नूतनीकरणासाठी निधी दिला आहे.

Pankaj Tripathi School

गावासाठी काहीतरी करायचे होते

जेव्हा बिहार राज्यातील गोपालगंज जिल्हा प्रशासनाने अशा व्यक्तींना पाठिंबा देण्याची योजना जाहीर केली, जे गाव सोडून सध्या शहरात वास्तव्य करतात , परंतु त्यांच्या मूळ गावांसाठी काही करू इच्छित आहे ;आणि त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये पंकज त्रिपाठींना ही कल्पना आली.

 पंकज त्रिपाठी म्हणतात, “हा एक चांगला उपक्रम असल्यासारखे वाटले. दोन महिन्यांनी मला शाळेच्या मुख्याध्यापकांचा फोन आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कंपाउंड वॉल आणि गेट बांधण्यासाठी त्यांना निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले .

भावासोबत शाळेला दिली भेट

जेव्हा पंकज त्रिपाठी यांचा मोठा भाऊ विजेंद्र सोबत त्यांच्या शाळेला भेट दिली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की शाळा चांगल्या स्थितीत नव्हती. या जानेवारीपासून सुरू झालेल्या शाळेच्या नूतनीकरणाला दोघांनी लगेच मदत करण्याचे ठरवले. “विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा देऊन नियमितपणे शाळेत येण्यास प्रवृत्त करणे हा यामागचा उद्देश होता. 

पंकज त्रिपाठी म्हणतात "आम्ही इको-फ्रेंडली सोलर पॅनेल्स बसवले आणि शाळेला वीज पुरवठ्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले". पुढे, पंकज त्रिपाठींचे एक विस्तृत ग्रंथालय तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. ते पुढे म्हणतात, “मी एक उत्कट वाचक आहे आणि विद्यार्थ्यांनीही वाचनाची सवय लावावी अशी माझी इच्छा आहे.”

नवोदित कलाकारांना सल्ला

एकदा नवोदित कलाकारांना सल्ला देताना पंकज कपूर म्हणाले क्राफ्ट आणि ग्राफ्टला मानून युवा पिढीने चित्रपटसृष्टीत नाव कमावण्यासाठी खूप मेहनत घ्यायला हवी. तंत्रशुद्ध शिक्षणाचा ध्यास घ्यायला हवा. थोडेसे यश मिळाले म्हणून हुरळून न जाता कला क्षेत्रातील अभ्यास सतत सुरू ठेवावा.

सध्याची युवा पिढी अतिशय हुशार आहे. आपले करिअर घडविण्यासाठी ती सतत धडपडताना दिसते. ही धडपड त्यांनी कायम ठेवावी, असा संदेश पंकज त्रिपाठी यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT