Amitabh Bachchan Dainik Gomantak
मनोरंजन

Dance Video: पाकिस्तानी आयशानंतर 'मेरा दिल ये पुकारे' गाण्यावर थिरकले भानू प्रताप

Viral Dance Video: पाकिस्तानी तरुणी आयशाने ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्यावर डान्स करुन नवा ट्रेंड सुरु केला आहे.

दैनिक गोमन्तक

Viral Dance Video: पाकिस्तानी तरुणी आयशाने ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्यावर डान्स करुन नवा ट्रेंड सुरु केला आहे. आता प्रत्येकजण या गाण्यावर आपला व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. आयशाने एका लग्न समारंभात ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. आयशाचा व्हिडिओ पोस्ट होताच प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर या गाण्यावर व्हिडिओ रील बनवण्याची जणू स्पर्धाच सुरु झाली आहे. यातच आता 'सूर्यवंशम' चित्रपटातील भानू प्रतापही या स्पर्धेत सामील झाले आहेत.

वास्तविक, एका सोशल मीडिया यूजरने भानू प्रताप यांची 'सूर्यवंशम' चित्रपटातील या गाण्यावरील नृत्याची क्लिप एडिट केली आहे. सोशल मीडियावर ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ गाण्याची ही एडिटेड क्लिप लोक खूप शेअर करत आहेत.

दरम्यान, व्हायरल रीलमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच भानू प्रताप हे लता मंगेशकर यांच्या 'मेरा दिल ये पुकारे आजा'च्या रिमिक्स बीट्सवर थिरकताना दिसत आहेत. क्लिप अशाप्रकारे एडिट केली आहे की, भानू प्रताप आपल्या व्हिडिओमध्ये आयेशाच्या डान्स मूव्हची कॉफी करताना दिसत आहेत. ही क्लिप 'manojchauhan70_' ने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

तसेच, 9 डिसेंबर रोजी इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून, व्हिडिओ 11 दशलक्ष लोकांनी पाहिला आहे, तर 900,000 लाईक्स केले आहे. "मेरा दिल ये पुकारे आजा" वर केलेला डान्स आयशाच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) आल्यानंतर आयशा इंटरनेट सेन्सेशन बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT