Priyanka Chopra Dainik Gomantak
मनोरंजन

प्रियांकाला लेकीचं किती कौतुक...मुलगी मालतीने काढलेली रांगोळीचा फोटो सोशल मिडीयावर केला पोस्ट

अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या मुलीने मालतीने काढलेल्या रांगोळीचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.

Rahul sadolikar

प्रियांका चोप्राने मुलगी मालतीने काढलेली एक रांगोळी आपल्या चाहत्यांसोबत फोटो पोस्ट करत शेअर केली आहे.. मालती सध्या एक वर्ष 10 महिन्यांची आहे आणि जानेवारी 2023 मध्ये ती दोन वर्षांची होईल. पण त्याच्या प्रतिभेची झलक दिसू लागली आहे.

मालतीने काढली रांगोळी 

छोटी मालती आई प्रियंकासारखी क्रिएटिव्ह आहे. 12 नोव्हेंबर रोजी सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. प्रियांका चोप्रानेही दिवाळीची जोरदार तयारी केली. यावेळी लहान मालतीने सुंदर रांगोळी काढली. त्याची झलक प्रियांकाने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीजवर केले शेअर

प्रियांका चोप्राने दिवाळीनिमित्त तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासने काढलेल्या रांगोळीचा फोटो शेअर केला आहे. गुलाबी रंगाच्या फुलांच्या नमुन्यात रांगोळी काढण्यात आली होती. मालतीची कलात्मकता रांगोळीत स्पष्ट दिसते.

आपली मुलगी मालतीचे असे टॅलेंट पाहून प्रियांकालाही आश्चर्य वाटले. तिने इन्स्टा स्टोरीवर रांगोळी शेअर करत लिहिले, 'पहिली रांगोळी'. यासोबत हात जोडून हृदयाचा इमोजीही बनवण्यात आला आहे.

प्रियांकाच्या घरी सगळे सण साजरे

प्रियांकाने 1 डिसेंबर 2018 रोजी निक जोनासशी लग्न केले आणि जानेवारी 2022 मध्ये ते सरोगसीद्वारे मालती मेरीचे पालक झाले. प्रियांका लग्न करून परदेशात स्थायिक झाली असली तरी ती अजूनही भारतीय संस्कृती आणि सभ्यतेशी जोडलेली आहे. प्रियांका तिच्या लॉस एंजेलिसच्या घरी प्रत्येक हिंदू सण मोठ्या थाटामाटात साजरा करते.

Raj Kundra: ''माझी एक किडणी घ्या'' राज कुंद्राने प्रेमानंद महाराजांना केली भलतीच विनंती; नेटकऱ्यांकडून झाली जोरदार टीका

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी; प्रशासन सतर्क

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

SCROLL FOR NEXT