Ram Setu  Akshay Kumar
मनोरंजन

Akshay Kumar च्या 'राम सेतू'चा दमदार टिझर प्रदर्शित, चित्रपट प्रदर्शनाची तारिखही निश्चित

अक्षय कुमार सोबत या चित्रपटात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, अभिनेत्री नुसरत भरूचा आणि सत्यदेव कंचराणा दिसणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूड सूपरस्टार अक्षय कुमारचा आगामी चित्रपट राम सेतू (Ram Setu) याचा दमदार टिझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) दमदार अॅक्शन करताना दिसून येत आहे. तसेच, चित्रपटातील चित्रीकरण देखील अतिशय आकर्षक दिसत आहे. अक्षय कुमार सोबत या चित्रपटात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, अभिनेत्री नुसरत भरूचा आणि सत्यदेव कंचराणा दिसणार आहेत. अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रतिक्षा सिनेरसिक करत आहेत. चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्याने प्रक्षेकांची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.

अक्षय कुमारच्या मुलीचा रविवारी वाढदिवस झाला. यादिवशी त्याने राम सेतू चित्रपटाबाबत लोक व्यक्त करत असलेल्या प्रेमाचे कौतुक केले. तसेच, सोमवारी चित्रपटाची पहिली झलक देखील प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. आज दुपारी बारा वाजता चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला. अक्षय कुमार राम सेतू या चित्रपटात अतिशय वेगळ्या भूमिकेत दिसत असून, अनेकांनी अक्षयच्या या अवताराचे कौतुक केले आहे. चार तासांत या चित्रपटाच्या टिझरला पाच लाख व्हिव्ज मिळाल्या आहेत.

25 ऑक्टोंबरला होणार सर्वत्र प्रदर्शित

अक्षय कुमारचा राम सेतू 25 ऑक्टोंबरला होणार सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अक्षयचे अनेक चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच, राम सेतू या टायटालमुळे अनेकजणांच्या या चित्रपटाशी भावना देखील चिकटलेल्या आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून एक महिना आहे. तत्पूर्वी येणाऱ्या ट्रेलरची प्रतिक्षाही चाहत्यांना लागली आहे.

चित्रपटावर या गोष्टींचा परिणाम होण्याची शक्यता

बॉलिवूडमधील कुठला चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला नाही असे नाही. किंवा चित्रपट प्रदर्शनापूर्वी काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण केली जाते. राम सेतू बाबत देखील वाद झाले आहेत. तसेच, चित्रपटाची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या ईडीच्या रडारवर आहे. ती सध्या विविध चौकश्यांसाठी ईडी कार्यालयाला चकरा मारत आहे. त्यामुळे या गोष्टींचा चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होतो का हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच स्पष्ट होईल.

बॉलिवूडला तारणार का राम सेतू?

बॉलिवूड चित्रपटांची अवस्था सध्या अतिशय खराब आहे. अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकूण आपटत आहेत. राम सेतू या चित्रपट बॉलिवूडला तारणार का हाही महत्वाचा प्रश्न सध्या सिनेरसिक उपस्थित करत आहेत. अक्षय कुमारला देखील या चित्रपटाकडून अनेक अपेक्षा आहेत. अक्षय कुमारचे अलिकडे आलेले चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT