आजकाल चित्रपटांच्या कथांमध्ये युनिव्हर्स आणि क्रॉस ओव्हरचा ट्रेंड सुरू आहे. आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एका चित्रपटाच्या कथेचा दुस-या चित्रपटाच्या कथेशी संबंध येतो.
राज आणि डीके निर्मित शाहिद कपूर आणि विजय सेतुपती यांच्या 'फर्जी' या वेबसिरीजमध्येही असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. तेच राज आणि डीके, ज्यांनी यापूर्वी 'द फॅमिली मॅन' सारखी सुपरहिट वेबसीरिज बनवली होती.
विनोदाचा तडका फॅमिली मॅनला होता. आता राज आणि डीके देखील क्रॉसओव्हर आणि युनिव्हर्स ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत कारण त्यांच्या 'फर्जी'मध्ये 'द फॅमिली मॅन' पात्रांची झलक देखील आहे. आता 'फर्जी' आणि 'द फॅमिली मॅन 3'ची कथा पुढे जाऊन भेटणार की काय अशी याबाबत अंदाज बांधले जात आहे.
आता फॅमिली मॅन आणि फर्जी या कथा एकमेकांच्या कोणत्या पात्राची देवाण- घेवाण करतात आणि ती कशी करतात हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे.
शाहिद कपूर आणि विजय सेतुपती व्यतिरिक्त, केके मेनन आणि राशी खन्ना यांनीही राज आणि डीकेच्या 'फर्जी' या वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेची कथा 'द फॅमिली मॅन 3' शी कशी जोडली जाईल याचे काही संकेतही शोमध्येच दिले आहेत.
वेब सिरीज 'फर्जी' मधील एका सीनमध्ये विजय सेतुपतीने साकारलेलं पात्र मायकेल श्रीकांत तिवारीशी फोनवर बोलतो आणि केस सोडवण्यासाठी त्यांची मदत घेतो. दोघांमधला संवाद खूप मजेशीर आहे.
चेल्लम सर ज्या प्रकारे 'द फॅमिली मॅन' मधील मनोज बाजपेयीची भूमिका श्रीकांत तिवारीला टिपतात, त्याचप्रमाणे त्यांनी 'फर्जी'मध्ये मायकलला टिप्स दिली. चेल्लम सर हे सर्व माहिती असलेले पात्र आहे. त्याचे सोर्स खूप मजबूत आहेत. तो फार कमी सीन्समध्ये दिसत असला तरी त्याची उपस्थिती पुरेशी आहे.
थोडक्यात आता फर्जीची केस सोडवायला श्रीकांत येणार आणि धमाल उडवुन देणार हे नक्की. हा ट्रेंड आपल्याला पठाण चित्रपटाच्या माध्यमातून बघायला मिळाला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.