Nora Fatehi Sukesh Chandrashehar Dainik Gomantak
मनोरंजन

Sukesh Chandrashekhar: अलिशान घर आणि गाडीच्या बदल्यात मला ही गोष्ट दे...सुकेश चंद्रशेखरने या अभिनेत्रीला दिली होती ऑफर...

मनी लॉंडरिंग प्रकरणी चर्चेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरचे कारनामे आता हळुहळु बाहेर येत आहेत. आता एका अभिनेत्रीने एक मोठा खुलासा केला आहे

Rahul sadolikar

सुकेश चंद्रशेखर(Sukesh Chandrashekhar) हे नाव गेल्या काही दिवसांपासुन सतत चर्चेत आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव सुकेश चंद्रशेखरसोबत जोडलं गेलं होतं. अत्यंत महागडी गिफ्टस आणि अलिशान गाड्या सुकेशने दिल्याचंही जॅकलिनने कबूल केलं होतं.

आता सुकेश चंद्रशेखरकडून 200 कोटींच्या खंडणीप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात डान्सिंग सेन्सेशन नोरा फतेहीनेही (Nora Fatehi) धक्कादायक खुलासा केला आहे.

नोरा फतेहीने तिच्या वक्तव्यात म्हटले आहे की, कॉनमन सुकेश चंद्रशेखर तिला आपली गर्लफ्रेंड बनवू इच्छित होता. नोराने सांगितले की, सुकेश आपलं सगळं बोलणं पिंकी इराणीच्या माध्यमातून नोरा फतेहीपर्यंत पोहोचवत असे.

नोराने दावा केला आहे की सुकेशने तिला आपली गर्लफ्रेंड होण्यासाठी प्रपोज केले होते आणि त्या बदल्यात तिला एक आलिशान घर आणि महागडी लाईफस्टाईल पुरवण्याचं आश्वासन दिलं होतं. ईडीच्या चौकशीनंतरच सुकेश हा ठग असल्याचं तिला समजलं, असंही नोराने आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे

चेन्नईतील एका कार्यक्रमात सहभागी होण्याच्या बदल्यात सुकेशची पत्नी लीनाने नोरा फतेहीला एक बीएमडब्ल्यू कार आणि एक आयफोन भेट दिल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते. पण, नोरा फतेहीने या गोष्टी खोट्या असल्याचं म्हटलं आहे. 

ईडीच्या चौकशीदरम्यान नोरा म्हणाली होती की, कार्यक्रमापूर्वी किंवा नंतर तिला सुकेशकडून कोणतीही भेट मिळाली नाही. ही गोष्ट कितपत खरी हे त्या दोघांनाच माहित

कृपया सांगा की जॅकलीन फर्नांडिसने कोर्टाला असेही सांगितले आहे की सुकेशने तिला अनेक अधिकाऱ्यांना भेटायला लावले होते. मग त्याला पहिल्यांदा जाणवले की आपण काहीतरी चुकीचे करत आहोत. 

जॅकलिन फर्नांडिसने असेही सांगितले आहे की पिंकी इराणीने तिच्या मेकअप आर्टिस्टला आपण गृह मंत्रालयाची अधिकारी असल्याचे पटवून दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ST Reservation Goa: 'काँग्रेसमुळे रखडले एसटी समाजाचे राजकीय आरक्षण'; सत्ताधारी - विरोधकांची सभागृहात खडाजंगी

Satyapal Malik Death: गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shukra Gochar 2025: पैशांचा पाऊस पडणार! शुक्र गोचरामुळे बदलणार 'या' राशींचे आयुष्य

लंडनचा फिल्ममेकर गोव्यात येतो! मराठी चित्रपट महोत्सवात पर्वणी; सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव यांचे नवेकोरे सिनेमे पाहता येणार..

Goa Assembly Live: होंडा आयडीसी येथे घराला आग लागून मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT