Nora Fatehi Dainik Gomantak
मनोरंजन

नोरा फतेहीने तर कमालच केली! मुंबई मेट्रोमधील Video Viral

Nora Fatehi: ती नुसतीच मेट्रोमध्ये गेली नाही तर तिने तिथे डान्सदेखील केला.

दैनिक गोमन्तक

Nora Fatehi at mumbai metro dance video viral

बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या चित्रपटांमुळे, कधी त्यांच्या वैयक्तिक आय़ुष्यामुळे तर कधी सोशल मिडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे हे कलाकार चर्चेत असतात. हे कलाकार नेटकऱ्यांच्या टीकेचे लक्ष्य बनतात. आता असाच काहीसा प्रकार नोरा फतेहीसोबत घडला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही आपल्या बोल्ड डान्स मुव्ह साठी ओळखली जाते. तिने आपल्या कलागुणांच्या जोरावर मनोरंजनसृष्टीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता मात्र अभिनेत्री नुकतीच मुंबई मेट्रोमध्ये गेल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ती नुसतीच मेट्रोमध्ये गेली नाही तर तिने तिथे डान्सदेखील केला. आता हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर कंमेंट करताना दिसत आहेत.

एका युजरने म्हटले आहे- जर ती मेट्रोमध्ये जात असेल तर ती चांगले कपडे घालू शकत नाही का? दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, चित्रपट मिळवण्यासाठी इतकी असभ्यता?

दरम्यान, 'डान्स प्लस प्रो' या लोकप्रिय डान्स शोमध्ये गेली होती. रेमो डिसूजा, शक्ती मोहन, पुनित पाठक या शोचे जज तर राघव जुयाल हा अँकर आहे. इंटरनेटवर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये नोरा फतेही तिच्या 'नाच मेरी रानी' या गाण्यावर स्टेजवर परफॉर्म करताना दिसली.

नोरा फतेही रॉकी हॅंडसम, मिस्टर एक्स, बाहुबली: द बिगनर अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तर २०२४ मध्ये 'मडगाव एक्सप्रेस' या चित्रपटामधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फुल पैसा वसूल! रोहित शेट्टी आणतोय 'Golmaal 5', गोव्यात होणार शूटिंगची सुरुवात; अजय देवगणनं दिलीये हिंट

Delhi Airport Technical Glitch: 800 फ्लाईट्सना विलंब, अनेक रद्द; दिल्ली विमानतळावर तांत्रिक अडचणीचा हजारो प्रवाशांना फटका

"तुझी मासिक पाळी संपली की सांग...": महिला क्रिकेटपटूचा सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, क्रीडा विश्वात खळबळ

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Goa Today's News Live: काणकोण बसस्थानकाजवळील रस्त्याची दुर्दशा, चालक हैराण

SCROLL FOR NEXT