Nawazuddin Siddiqui  Dainik Gomantak
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui :"जेव्हा नवाजुद्दीन सिद्दीकीला कॉलर पकडून बाहेर काढले होते"

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने इंडस्ट्रीत येण्यासाठी केलेला संघर्ष

Rahul sadolikar

नवाजुद्दीन सिद्दीकीची गणना आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार्समध्ये केली जाते. प्रत्येकाला त्याच्यासोबत काम करायचे होते. पण करिअरच्या सुरुवातीला जेव्हा नवाजुद्दीन स्ट्रगल करत होता, तेव्हा त्याची अवस्था खूप वाईट होती. 

नवाजुद्दीन सिद्दीकीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो काळ आठवला जेव्हा तो चित्रपटांमध्ये कोणीही नव्हता आणि काही चित्रपटांच्या सेटवर त्याच्याशी किती वाईट वागणूक दिली गेली. एकदा नवाजुद्दीन सिद्दीकीला मेन लीड अॅक्टर- अॅक्ट्रेस खात असलेल्या ठिकाणी जेवल्याबद्दल कॉलर पकडून बाहेर काढले गेले होते.

'सरफरोश'मधली आमिरसोबतची भूमीका

नवाजुद्दीन सिद्दीकीने 1999 मध्ये आमिर खान स्टारर 'सरफरोश' मधील छोट्या भूमिकेतून अभिनयात पदार्पण केले. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या. मात्र, या काळात त्याच्यावर अन्याय झाला. नवाजुद्दीन सिद्दीकीने 'बीबीसी हिंदी'शी संवाद साधताना त्याच्या कारकिर्दीतील संघर्षमय टप्प्याची आठवण केली.

नवाजला मिळालेली वागणूक आणि सेटवरचं जेवण

सेटवरील जेवणाची व्यवस्था आणि त्याला मिळालेल्या वागणूकीबद्दल नवाज म्हणाला, 'येथे जेवणाची व्यवस्थाही वेगळी आहे. ज्युनियर कलाकारांसाठी ते वेगळे असते. जे मोठे कलाकार आहेत त्यांच्यासाठी ते वेगळे आणि जे मुख्य कलाकार आहेत त्यांच्यासाठी ते वेगळे आहे. पण काही प्रॉडक्शनमध्ये सगळे कलाकार एकत्र जेवतात. 

जेवण दिल्यावर सगळे एकत्र जेवतात. अशी अनेक प्रॉडक्शन्स आहेत जिथे वेगवेगळ्या व्यवस्था आहेत. मी अनेक वेळा मुख्य भागात जेवण्याचा प्रयत्न केला आहे जिथे मुख्य लोक (नायक आणि नायिका) खातात. मात्र तिथुन नवाजला कॉलर पकडून बाहेर काढण्यात आलं होतं.

ज्येष्ठ अभिनेत्याकडून 50 रुपये घेतले होते.

चित्रपटांमधील छोट्या भूमिकांशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकीने टीव्ही मालिकांमध्येही काम केले. एक काळ असा होता की नवाजुद्दीनकडे एक रुपयाही नव्हता आणि त्याला जेवण करून बरेच दिवस झाले होते. त्यानंतर त्यांनी एका ज्येष्ठ अभिनेत्याकडून 50 रुपयांचे कर्ज मागितले. त्याबद्दल नवाजुद्दीनने सांगितले की, त्या ज्येष्ठ अभिनेत्याची प्रकृतीही चांगली नव्हती. 

नवाजप्रमाणे त्याचे कामही चांगले चालत नव्हते. ज्येष्ठ अभिनेत्याकडे केवळ 100 रुपये होते, त्यातील 50 रुपये त्याने नवाजुद्दीनला दिले. तेव्हा नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तो ज्येष्ठ अभिनेता त्यांची अवस्था पाहून रडला होता.

नवाजला मिळालेली ओळख आणि आगामी चित्रपट

नवाजुद्दीन सिद्दीकीला 'पीपली लाइव्ह' आणि 'कहानी' सारख्या चित्रपटातून ओळख मिळू लागली आणि त्यानंतर 'गँग्स ऑफ वासेपूर'ने नशीब फिरवले. नवाजुद्दीन सिद्दीकीने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. चांगले चित्रपट आणि पात्र येऊ लागले. 

नवाजुद्दीनचे यावर्षी जवळपास 8 चित्रपट आहेत, ज्यात 'हुड्डी', 'सैंधव', 'अदभूत', 'टिकू वेड्स शेरू', 'नूरानी चेहरा', 'बोले चुडिया' आणि 'संगीन' यांचा समावेश आहे. त्याचा 'जोगिरा सारा रा रा' मे महिन्यात रिलीज झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

IND vs SA 2nd Test: केएल राहुलला टर्न समजलाच नाही, सायमन हार्मरच्या 'अविश्वसनीय' चेंडूवर त्रिफळाचीत! तुम्ही VIDEO पाहिला का?

Smriti Mandhana: 'तिला' स्विमिंगसाठी विचारलं! पलाश मुच्छलचे भलत्याच मुलीसोबत चॅट्स व्हायरल; क्रिकेटर स्मृतीला मोठा धक्का?

Goa News: ५६ व्या IFFI मध्ये विविध राज्यांच्या लोकनृत्यांचे दर्शन; कलाकारांनी मानले आभार

SCROLL FOR NEXT