Nawazuddin Siddiqui Haddi Look
Nawazuddin Siddiqui Haddi Look Dainik Gomantak
मनोरंजन

Haddi चित्रपटातून समोर आला नवाजुद्दीन सिद्दीकीचा गजब लूक, पाहून चाहत्यांना बसला धक्का

दैनिक गोमन्तक

Nawazuddin Siddiqui Haddi Look: नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या अभिनयामुळे चित्रपटसृष्टीत विशेष स्थान निर्माण केले आहे. चित्रपटांमध्ये विशेष व्यक्तिरेखेचे ​​प्रयोग करताना ते मागेपुढे पाहत नाही. यावेळी तो एका ग्लॅमरस ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहे. होय, नवाजुद्दीनच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे, ज्याचे शीर्षक ‘हड्डी’ असे आहे आणि यासोबतच निर्मात्यांनी त्याचा फर्स्ट लुक देखील रिलीज केला आहे.

नवाजुद्दीनचा ‘हड्डी’ लूक पाहून प्रेक्षकांना अश्चर्याचा धक्का बसेल. त्याची ओळख पटवणे खूप कठीण होत आहे. अप्रतिम परिवर्तन घडले आहे. मोशन पोस्टरमध्ये तो ग्लॅमरस केस आणि मेकअपसह ग्रे कलरच्या गाऊनमध्ये दिसत आहे. तसेच, त्याच्या हातात रक्ताने माखलेले शस्त्रही आहे जे त्याच्या अगदी जवळच ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट एक रिव्हेंज ड्रामा आहे.

नवाजुद्दीनच्या या लूकवर सोशल मीडियावर लोकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. त्याचा हा लूक पाहून सर्वांनाच अश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेक चाहत्यांनी याचे वर्णन 'एपिक लूक' असे केले आहे. अनेकांना तो एका नजरेत अर्चना पूरण सिंगसारखा दिसतो. तुमचीही क्षणार्धात फसवणूक होऊ शकते आणि तुम्ही त्याला अर्चना समजू शकता. सर्वजण नवाजुद्दीनच्या या लूकचे कौतुक करत आहेत.

नवाजुद्दीन सिद्दीकीचा हा लूक पाहून चाहते 'हड्डी' चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, याबाबत अद्याप फारसा खुलासा झालेला नाही. सध्या त्याचे शूटिंग सुरू असून पुढच्या वर्षी रिलीज करण्याची तयारी सुरू आहे. झी स्टुडिओ आणि आनंदिता स्टुडिओ संयुक्तपणे याची निर्मिती करत आहेत. अक्षत अजय शर्माने दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

Goa Today's Live News: कॅथलिक विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी - चर्चिल आलेमाव

Sam Pitroda: ‘’भारतात पूर्वेकडील लोक चिनी तर दक्षिणकेडील लोक...’’ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी पुन्हा बरळले

Lok Sabha Election 2024: मतदान करतानाचा फोटो काढताना फातोर्डा येथे महिलेला पकडले; चौकशीअंती सुटका

Watch Video: पाकिस्तानमधील टार्गेट किलिंगमध्ये भारताचा हात; पाक लष्करी अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT