Women's Day Dainik Gomantak
मनोरंजन

Women's Day: महिला दिनानिमित्त 'हे' 5 चित्रपट पाहिलेच पाहिजेत

दैनिक गोमन्तक

Women's Day special movies

दरवर्षी संपूर्ण जगभर 8 मार्चला महिला दिन साजरा केला जातो. महिलांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. याबरोबरच, लैंगिक समानता, महिलांचे अधिकार, महिलांसोबत केले जाणारे अपराध यासारख्य़ा प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक महिला दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जाणून घेऊयात बॉलीवूडमध्ये असे कोणते महिलाप्रधान चित्रपट आहेत, जे आज तुम्ही पाहू शकता.

१. थप्पड

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा थप्पड हा चित्रपट एक उत्तम चित्रपट मानला जातो. एका गृहिणीला भर कार्यक्रमात तिच्या नवऱ्याकडून कानाखाली मारण्यात येते आणि त्यानंतर हे किती नॉर्मल आहे, अशाप्रकारचे कुटुंबियांकडून वागणूक दिली जाते. त्यावर ती गृहिणी काय करते, कशाप्रकारे आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देते अशा परिस्थितीवर बेतलेला हा चित्रपट आहे. 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अनुभव सिन्हा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

२. क्वीन

2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवाणी दिली होती.एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी एकटीच आपल्या हनीमूनला जाते. विकास बहल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपटाची निर्मिती अनुराग कश्यप यांनी केली आहे. कंगना रणौत, राजकुमार राव हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसून आले होते.

३. मेरी कोम

भारतीय बॉक्सिंगपटू मेरी कोम यांच्या आयुष्यावर आधारित मेरी कोम हा चित्रपट 2014 ला प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. ओमंग कुमार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

४. इंग्लिश विंग्लीश

श्रीदेवी यांची मुख्य भूमिका असलेला इंग्लीश विंग्लीश हा चित्रपट मोठा गाजला होता. 2012 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट गौरी शिंदे यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.

५. नीरजा

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेला नीरजा हा चित्रपट आजच्या दिवशी महिलांनी नक्कीच पाहिला पाहिजे. २०१६ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

महिला सशक्तीकरणावर भर देणारे असे चित्रपट पाहून आजचा दिवस आणखी खास केला जाऊ शकतो. वरील चित्रपटांबरोबरच, राझी, दंगल, मर्दानी, वंडर वुमेन असे चित्रपट पाहिले जाऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT