Senior actor Mukesh Khanna Dainik Gomantak
मनोरंजन

गायींची हत्या करणाऱ्यांवर मुकेश खन्ना भडकले

जेष्ट अभिनेता मुकेश खन्ना यांचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असून मुकेश खन्ना गाईच्या सुरक्षेबाबत खूप चिंतेत आहेत.

दैनिक गोमन्तक

जेष्ट अभिनेता मुकेश खन्ना (Senior actor Mukesh Khanna) यांनी गाईच्या (cow) सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. मुकेश खन्ना यांचा इनस्टाग्राम (Instagram) वरील एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये ते एका गायीच्या हत्येवर आणि त्याचे मांस खाणाऱ्यांवर चिडलेले दिसत आहेत.

मुकेश खन्नाचा यांचा इनस्टाग्राम वरील हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका गायीच्या हत्येवर आणि त्याचे मांस खाणाऱ्यांवर चिडलेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मुकेश खन्ना म्हणत आहेत की, 'तुम्ही कल्कीच्या येण्याची बघत आहात का? ते येऊन आपल्या गोमातेला वाचवण्याची आपण वाट पाहत आहोत का? आपण आपल्या कुटुंबाच्या आईशी असं वागू शकतो का? असा प्रश्न त्यांनी या व्हीडिओच्या माध्यमातून विचारला आहे.

मुकेश खन्ना पुढे म्हणताना दिसतात, "'गाय का निर्यात केली जाते, का मारली जाते, तिला का कापले जाते, का ती खाल्ली जाते? गोमातेच्याबद्दल इतके कठोर नियम असून देखील, हा प्रकार उघड पणे चालूच आहे. कारण काही लोक बाहेरच्या देशांतून जेवल्यानंतर येतात, मग त्यांना त्याची सवय लागते. नंतर त्यांच म्हणण असतं की त्यांचे मांस चांगले आहे, तुम्हाला लाज वाटली पाहिजे आणि काही लोक असे करतात कारण त्यांचा व्यवसाय आहे, ते परदेशात विकतात, मग ते लाखो आणि कोटी कमावतात. हे बंद केले पाहिजे. मी विषयी सरकारशी ही बोलेन."

तसेच, मुकेश खन्ना यांनी महाभारताचे पात्र भीष्म पितामह यांच्यावर देखील चर्चा केली आणि म्हणाले, 'असे म्हटले जाते की ज्याप्रमाणे भीष्म पितामहचा आत्मा पवित्र मानला जातो, त्याचप्रमाणे गायमातेचा आत्माही पवित्र असल्याचे म्हटले जाते. जर लोक सहमत नसतील तर मी सरकारला पांढऱ्या गायीला आपला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यास सांगेन. सिंह हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे, पण तो स्वतःचा बचाव करू शकतो, परंतु गाय करू शकत नाही'.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हणले आहे की, 'श्रीकृष्ण गायींसोबत राहत होते हे आम्हाला पुन्हा पुन्हा सांगावे लागेल का? ते त्यांचे दूध आणि त्यांच्यापासून बनवलेले लोणी खाऊन मोठे झाले. आपल्या आजूबाजूला गायी कापल्या गेल्याचे पाहूनही आम्ही गप्प बसतो! गोमातेची कत्तल केली जात आहे. त्यांचे मांस खाल्ले जात आहे, ते पैसे कमवण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात केले जात आहेत. उघडपणे! आणि आम्ही सगळे मूक प्रेक्षक म्हणून गप्प आहोत! आपल्याला लाज वाटली पाहिजे. जे ते आवडीने खातात. ते थांबवले पाहिजे. आणि माझ्या मते हा एकमेव मार्ग आहे की सरकारने गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे.

सिंह स्वतःचा बचाव करू शकतो. पण गाय तिच्या भक्तांकडे मंद नजरेने पाहते की त्यांनी पुढे जाऊन त्यांचे रक्षण केले पाहिजे. त्यांच्या मारेकऱ्यांकडून, त्यांच्या खाणाऱ्यांकडून. पण प्रत्येकजण आपल्या आयुष्यात व्यस्त असतो. त्यामुळे सरकारने पुढे येऊन गायीला राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केले पाहिजे. तरच आपल्या विवेकाने, भक्तीने, विश्वासाने न्याय होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT