Bramhastra Movie Song  Dainik Gomantak
मनोरंजन

Alia Bhatt: ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील बहुप्रतिक्षित ‘केसरिया’ गाणं प्रदर्शित

गाणं पाहून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट चा बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट 'केसरीया' या गाण्यामुळे सातत्याने चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा प्रेक्षक आतुरतेने करत आहेत. ब्रह्मास्त्र या चित्रपटासाठी जवळपास ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहेत. ब्रह्मास्त्र या चित्रपटाचे तीन भाग असणार आहेत. तोडीस तोड असे स्टार कास्ट आणि मोठ्या खर्चासोबतच खुप जास्त मेहनत या चित्रपटासाठी टीमने घेतली आहे. या चित्रपटातील केसरिया हे गाणे अखेर प्रदर्शित झाले आहे. नुकतंच आलिया भट्टने याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून त्यातील ‘केसरीया’ हे गाण चांगलच चर्चेत आलं होत. केसरीया या गाण्यात आलिया आणि रणबीरची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर त्याला लाखोमध्ये व्ह्यूज मिळाले होते.

आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. याला तिने हटके कॅप्शन दिले आहे. “आमच्या प्रेमाची धून आता आपली, केसरिया गाणे प्रदर्शित झालं आहे”, असे कॅप्शन तिने इंग्रजीमध्ये दिले आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. या गाण्यात प्रीतम दा, अरिजीत सिंह आणि अमिताभ भट्टाचार्य यांच्या तिघांचे आवाजाचे जबरदस्त ट्युनिंग दिसते.

अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेकांनी ‘ब्रम्हास्त्र’च्या ट्रेलरचं कौतुक केलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक, इतर भारतीय चित्रपटांसाठी ‘ब्रम्हास्त्र’ आदर्श ठरेल, ट्रेलरने अधिक उत्सुकता वाढवली आहे, बॉलिवूड इज बॅक अशा शब्दांमध्ये नेटकऱ्यांनी या ट्रेलरचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

या चित्रपटामध्ये वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचं विशेष कौतुक होत आहे. या चित्रपटाची कथा पौराणिक कथांवर आधारलेली आहे. अमिताभ बच्चन यांच्या आवाजाने या ट्रेलरची सुरूवात होते. प्रेम, रोमान्स, थ्रिलर आणि सस्पेन्स सारंच या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासह अमिताभ बच्चन, सुप्रसिद्ध साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय यांच्या देखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT