Mia Khalifa Dainik Gomantak
मनोरंजन

Big Boss OTT: यंदाच्या बिग बॉस ओटीटीमध्ये मिया खलिफा दिसणार? आणखी कोण होणार घरात बंद..

Big Boss OTT: राज कुंद्रादेखील या शोचा भाग होऊ शकतो .

गोमन्तक डिजिटल टीम

Big Boss OTT: बीग बॉसचा शो म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असते. काही स्पर्धकांमुळे काही सीझन कायमसाठी लक्षात राहतात. गेल्या वर्षी सुरु केलेला ओटीटीवरील बीग बॉसच्या पहिल्यासीझनाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.

आता बीग बॉस ओटीटीवरील दुसरा सीझन लवकरच भेटीला येणार आहे. 17 जूनला सुरु होणाऱ्या या शोमध्ये कोणते स्पर्धक असणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे.

ओटीटीच्या या नवीन सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या अनेक सेलिब्रिंटींची नावे पुढे येत असून काही नावांवर मात्र शिक्कामोर्तब झाला आहे. यामध्ये आकांक्षा पुरी, पुनित सुपरस्टार, अविनाश सचदेव, मराठी चित्रपट वेड फेम जिया शंकर, आलियी सिद्दकी, बेबिका धुर्वे यांचा समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे.

आता मिया खलिफा वाइल्ड कार्डद्वारे शोमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. शोचे मेकर्स मिया खलिफाबरोबर बीग बॉसमधील प्रवेशाबाबत चर्चा करत असल्याची माहीती समोर आले आहे. असे असले तरीही याबाबत मियाकडून अथवा बीग बॉसच्या मेकर्सकडून कोणतीही अधिकृत माहीती देण्यात आली नाही.

याबरोबरच, राज कुंद्रादेखील या शोचा भाग होऊ शकतो असेही म्हटले जात आहे. आता कोणता स्पर्धक प्रेक्षकांचे मन जिंकून घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जिओ सिनेमाने रिलिज केलेल्या प्रोमोनुसार सलमान खान शोचे होस्टींग करणार असल्याचे नक्की झाले आहे. दरम्यान, बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनचे होस्टींग करण जोहरने केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

SCROLL FOR NEXT