Iffi Goa Dainik Gomantak
मनोरंजन

IFFI: अजय देवगण, सुनील शेट्टी, वरुण धवन, ए आर रेहमानसह अनेक बॉलिवूड, हॉलिवूड कलाकार राहणार इफ्फीत उपस्थित

इफ्फीदरम्यान 118 आंतरराष्ट्रीय आणि 221 भारतीय चित्रपट कलाकार उपस्थित राहणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Iffi Goa: गोव्यात 20 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (53rd Edition Of Iffi, Goa) उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सिनेरसिकांसाठी पर्वणी ठरणाऱ्या या महोत्सावात अनेक भारतीय आंतरराष्ट्रीय तसेच देशातील विविध भाषेतील चित्रपट पाहण्याची संधी सिनेरसिकांना मिळणार आहे. याशिवाय, अनेक भारतीय, आंतरराष्ट्रीय दिग्गज सिनेकलाकार देखील या महोत्सवाला उपस्थिती लावणार आहेत. अनेक बॉलिवूड, हॉलिवूड कलाकार इफ्फीत उपस्थित राहणार आहेत.

इफ्फीच्या कर्टन रेझरनिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. इफ्फीदरम्यान 118 आंतरराष्ट्रीय आणि 221 भारतीय चित्रपट कलाकार उपस्थित राहणार आहेत.

इफ्फीसाठी खालील बॉलिवूड कलाकार राहणार उपस्थित (Many Bollywood Actor, Actress to Attend Iffi in Goa)

अजय देवगण, सुनील शेट्टी, वरुण धवन, क्रिती सानोन, प्रभूदेवा, मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, शेखर कपूर, राणा डगुबत्ती, मणिरत्नम, ए आर रेहमान, पंकज त्रिपाठी, परेश रावल, अक्षय खन्ना, कलकी कोचलेन, यामी गौतमी, दीनेश विजन, इलियाना डिक्रूज, आर. बाल्की, अनुपम खेर यांची उपस्थिती निश्चित झाली आहे.

उपस्थित राहणारे हॉलिवूड कलाकार (Many Hollywood Actor, Actress to Attend Iffi in Goa)

मॅडी हॅसन, जॉन लॉईड क्रुज, जेनिसिस रॉड्रिग्ज, डॅनियल गोल्डहॅबर, इमिली कॉक्स यासह 118 हॉलिवूड कलाकार उपस्थित राहणार आहेत.

गोव्यात 20 ते 28 या कालावधीत भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. यात भारतीय पॅनोरमा विभागात 23 भाषा आणि बोलीभाषेतील एकूण 339 फिचर फिल्म दाखवण्यात येणार आहेत अशी माहिती NFDC चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र भाकर यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT