Bigg Boss 17 Dainik Gomantak
मनोरंजन

Mannara Chopra: 'तू त्यांना संधी देऊ नकोस' प्रियांका चोप्राच्या आईचा मन्नारासाठी खास संदेश

Mannara Chopra: फिनालेची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी घरातील कोणता स्पर्धक विजेता होईल याच्या चर्चाही वाढत आहे.

दैनिक गोमन्तक

Mannara Chopra: 'बिग बॉस 17' त्याच्या ग्रँड फिनालेच्या अगदी जवळ आहे. फिनालेच्या अवघ्या एक आठवड्यापूर्वी ईशा मालवीय शोमधून बाहेर पडली आहे, तर आता शोच्या विजेत्यासाठी प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. मात्र, फिनालेची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी घरातील कोणता स्पर्धक विजेता होईल याच्या चर्चाही वाढत आहे.

सध्या अंकिता ते मुनव्वर या शर्यतीत आघाडीवर असताना, मन्नाराच्या कुटुंबातील सदस्यांनी शोमध्ये आतापर्यंतच्या तिच्या दमदार दिसण्यावर मन्नराचे कौतुक केले आहे. मन्नाराची मावशी आणि प्रियांका चोप्राच्या आईने डॉ. मधू चोप्राने त्यांच्या कुटुंबातील प्रिय व्यक्तीला म्हणजेच मन्नाराला पाठिंबा दर्शवला आहे.

मन्नारा ही मधु चोप्राची भाची असून त्यांनी तिला पाठिंबा दर्शवण्यासाठी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. ज्यामध्ये ती तिला फिनालेसाठी शुभेच्छा देताना दिसत आहे. मन्नारा चोप्राच्या टीमने मधु चोप्राचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मधू व्यतिरिक्त मन्नाराची आणखी एक नातेवाईक या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्राची आई मन्नाराला प्रोत्साहन देताना दिसत आहे. तू खूप छान करत आहेस. अभिनंदन, तू अंतिम फेरीत पोहोचली असून मला तुझा अभिमान आहे. धैर्य ठेव, स्वत:ला मजबूत ठेव, त्यांना तुला कमोजर करु देण्याची संधी देऊ नकोस. तू चोप्रांची मुलगी आहेस आणि तू खरोखरच धाडसी आहेस. तुला खूप शुभेच्छा. अशा आशयाचा मधू चोप्रांचा व्हिडिओ आहे.

मन्नाराची बहीण मितालीने या व्हिडीओवर कमेंट करत मधू चोप्राच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. मितालीने लिहिले आहे- लव्ह यू मामी.

मन्नारा सुरुवातीपासूनच एक धाडसी स्पर्धक ठरली आहे. या शोमध्ये ती जवळपास एकटीच खेळताना दिसत आहे. अलीकडच्या काळात तिची मुनव्वरसोबतची बॉन्डिंग चांगली आहे. जिथे एकेकाळी घरातील सर्वजण मुनव्वरच्या विरोधात उभे राहिलेले दिसत होते, तिथे मन्नारा ही एकटीच त्याला साथ देत होती आणि त्याला धैर्य देण्याचा प्रयत्न करताना दिसली होती.

आता बिग बॉसच्या १७ च्या सीझनचा हा शेवटचा आठवडा असून ग्रँड फिनाले लवकरच पार परणार आहे, प्रेक्षकांचे मन जिंकत कोण ट्रॉफी आपल्या नावावर करणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घरात भांडण करुन पळाले, कच्छच्या जंगलात गाववाल्यांनी पकडले, अल्पवयीन पाकिस्तानी जोडप्याने प्रेमासाठी पार केली देशाची सीमा

Fishing Boat Accident: काणकोणातील राजबाग किनाऱ्यावर पुन्हा बोट उलटली, स्थानिक मदतीसाठी धावले!

Viral Video: बिहारमधून दिसू लागला हिमालय आणि माऊंट एव्हरेस्ट; मनमोहक व्हिडिओ आला समोर Watch

Goa Politics: आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत याची गॅरंटी द्या! ‘आप’चा काँग्रेससोबत युतीस स्पष्ट नकार

Shubhman Gill: "त्यांनी भारताला स्वबळावर अनेक सामने जिंकून दिले, आम्हाला त्यांची गरज..." नवा कर्णधार शुभमन गिलचे रोहित-विराटबाबत मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT