Pakhwaj & Tabla Dainik Gomantak
मनोरंजन

मालवणी व्हर्जन 'बचपन का प्यार' गाणं तुम्ही ऐकलत का?

आता या गाण्याच्या धर्तीवरच कोकणामधील (Konkana) काही उमद्या तरुणांनी पखवाज, टाळ, तबलाच्या साथीने चक्क मालवणी व्हर्जन तयार केले आहे.

दैनिक गोमन्तक

काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर (Social Media) हिट झालेलं लहानग्या सहदेवचं (Sahadeva) 'बचपन का प्यार' हे गाणं आपण सर्वांनी ऐकलं असेलच. आता या गाण्याच्या धर्तीवरच कोकणामधील (Konkana) काही उमद्या तरुणांनी पखवाज, टाळ, तबलाच्या साथीने चक्क मालवणी व्हर्जन तयार केले आहे. आणि आता सोशल मिडियावर या मालवणी गाणही (Malvani song) चांगलंच व्हायरल होत आहे. या मालवणी गाण्याचं बोल काही असं आहेत, 'जाने मेरी जाने मन न्हानपणीचा प्रेम माझा इसरा नको जाऊ तू ती हा माझी बाय गो, मी हा तुझा बाबलो,'

दरम्यान, अशा प्रकारची अनेक गाणी याआगोदरही हिट झाली आहेत. लहानग्यापासून ते अगदी वृध्दांपर्यत बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकताना दिसतात. भारताची प्रसिध्द बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने (P.V. Sindhu) सुचित्रा अकादमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात थिरकताना दिसून आली आहे. काही दिवसांपूर्वीच सिंधू टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून भारतात परतली. 'तेरी ऑंख्या का यो काजल' या सपना चौधरीच्या (Sapna Chowdhury) प्रसिध्द गाण्यावर सिंधूने जोरदार डान्स केला. त्या गाण्यासह बॉलिवूडमधील अनेक गाण्यावर तिने डान्स केला. त्याचबरोबर सिंधू यावेळी एकदम स्टायलिश लूकमध्ये दिसून आली. सिंधूच्या या डान्सने आयोजित केलेल्या पार्टीला चार चांद लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT