Malaika Arora Dainik Gomantak
मनोरंजन

Malaika Arora: अरबाजच्या लग्नाची धामधूम पण मलायकाच्या फोटोंनी घेतले लक्ष वेधून

Malaika Arora: सलमान खानने मलाइकाला पाठवलेल्या 'बिइंग ह्युमन' भेटवस्तू सध्या चर्चेत आहेत.

दैनिक गोमन्तक

Malaika Arora: एकीकडे चित्रपटसृष्टीत अरबाज खानच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावर मलायकाने फोटो शेअर करत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सलमान खानने अरबाजची पहिली पत्नी मलायका अरोराला काही भेटवस्तू पाठवल्या आहेत आणि अभिनेत्रीने त्या भेटवस्तूंची झलक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. अरबाज आणि शौरा खानच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान, सलमान खानने मलाइकाला पाठवलेल्या 'बिइंग ह्युमन' भेटवस्तू सध्या चर्चेत आहेत.

Malaika Arora

मलायकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सलमानच्या टीमने पाठवलेल्या भेटवस्तूंमध्ये सांताची लाल टोपी, हॉट चॉकलेट पावडरचा बॉक्स आणि मेणबत्त्या यासारख्या गोष्टी बॉक्समध्ये दिसत आहेत. यासोबत मलायकासाठी भेट म्हणून एक नोटही पाठवण्यात आली आहे.

या नोटमध्ये लिहले आहे की, तुम्हाला ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा! तुमच्या अतूट मैत्री आणि पाठिंब्याबद्दल आमच्या कौतुकाचे प्रतीक म्हणून आम्ही हा छोटासा गिफ्ट हॅम्पर तयार केला आहे. आशा आहे की ते तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल, जसे तुमच्या उपस्थितीमुळे आम्हाला आनंद होतो .

सलमान खानच्या कंपनीने अलीकडेच घोषणा केली होती की 'बीइंग ह्युमन' आता महिलांसाठी पूर्णपणे नवीन कलेक्शन लॉन्च करणार आहे. ख्रिसमस आणि तिच्या वाढदिवसाचा संदर्भ देत मलायकाने सलमानच्या कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या डिस्काउंटची माहितीही शेअर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

SCROLL FOR NEXT