Arjun Kapoor And Malaika Arora Dainik Gomantak
मनोरंजन

अर्जुन कपूरवरून ट्रोल करणाऱ्यांना मलायकाने दिले सडेतोड उत्तर

केवळ मलायकाच नाही तर अर्जुन कपूरही अनेकदा सोशल मीडियावर कमेंट करणाऱ्या ट्रोलवर ताशेरे ओढताना दिसत असतो.

दैनिक गोमन्तक

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दोघे एकत्र आहेत. हे दोघे बर्‍याचदा एकत्र दिसतात मात्र, मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या वयात 12 वर्षांचे अंतर आहे, अर्जुन कपूर मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायकाला वयाच्या या अंतरामुळे अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. (Malaika Arora gave a blunt answer to trolls from Arjun Kapoor)

मात्र, या ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने (Bollywood Actress) काय सडेतोड उत्तर दिले. मलायका म्हणाली होती की, तिला या टोमण्यांची अजिबात पर्वा नाही. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, 'आम्ही अशा समाजात राहतो, जिथे एखादा मोठा माणूस त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीशी प्रेम करतो, तर लोक त्याला मस्त म्हणतात, पण याउलट, जर एखादी वयस्कर स्त्री तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या पुरुषाला डेट करत असेल, तर लोक त्याला डेस्परेट म्हणतात.

मलायका (Malaika Arora) पुढे म्हणाली, मला आता या गोष्टींची पर्वा नाही आणि मी त्याकडे लक्षही देत ​​नाही. केवळ मलायकाच नाही तर अर्जुन कपूरही (Arjun Kapoor) अनेकदा सोशल मीडियावर अशा द्वेषपूर्ण कमेंट करणाऱ्या ट्रोलवर ताशेरे ओढताना दिसतो.

मलायकाचे पहिले लग्न 1998 मध्ये अभिनेता अरबाज खानसोबत झाले होते. या लग्नापासून मलायका आणि अरबाजला मुलगा अरहान खान देखील झाला. मात्र, लग्नाच्या 19 वर्षांनंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजने एकमेकांपासून घटस्फोट घेतला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT