Mahesh Babu  Dainik Gomantak
मनोरंजन

Mahesh Babu Birthday: अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतोय साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार

Mahesh Babu Birthday: त्याचे चाहते संपूर्ण जगभरात दिसून येतात.

दैनिक गोमन्तक

Mahesh Babu Birthday: साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार महेशबाबूचा आज वाढदिवस आहे. आपल्या अभिनय आणि रुपामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या महेश बाबु आज ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे.

महेश बाबुचा जन्म 9ऑगस्ट 1975 ला तमिळनाडूमध्ये चेन्नईला झाला होता. दिग्गज तेलुगू अभिनेता कृष्णा यांचा लहान मुलाने म्हणजेच महेश बाबुने बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले होते. तब्बल आठ चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले आहे.

महेशबाबुने 1999 ला राजाकुमरुडूबरोबर मुख्य अभिनेता म्हणून पहिल्या चित्रपटात काम केले आहे. आपल्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्याचे चाहते संपूर्ण जगभरात दिसून येतात.

सध्या आपला हा वाढदिवस खास बनविण्यासाठी स्कॉटलंडमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद साजरा करताना दिसत आहे. आपली पत्नी नम्रता शिरोडकर, मुलगी सितारा आणि मुलगा गौतम यांच्यासोबतचे काही फोटो अभिनेत्याने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

या फोटोवर नम्रताने लव्ह यू टू माय बड्डे बॉय असे म्हणत अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी नम्रतानेदेखील स्कॉटलंडमधील फोटो शेअर केले होते

महेशबाबुच्या आगामी काळातील कामाबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच त्रिविक्रम श्रीनिवास यांच्या गुटुंर कारम या चित्रपटात दिसून येणार आहे. श्रीलीला आणि मिनाक्षी चौधरी या अभिनेत्री मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT