dr. Babasaheb Ambedkar  Dainik Gomantak
मनोरंजन

Mahaparinirvan Din: बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित 'हे' 5 चित्रपट नक्की पाहा!

Films based on Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची गाथा सांगणारे अनेक चित्रपट आहेत.

दैनिक गोमन्तक

‘भारतीय संविधाना’चे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातात. 14 एप्रिल 1891 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थात भीमराव आंबेडकर यांचा जन्म झाला. डॉ. बाबासाहेब आंबेकर यांनी अगदी बालपणापासूनच समाजातील जातीभेद पाहिला होता. दलित समाजाला मिळणारी वागणूक त्यांनी जवळून अनुभवली होती. पुढे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजातील अशा लोकांच्या अधिकारांसाठी पुढाकार घेतला. त्यांच्या संघर्षाची गाथा सांगणरे चित्रपट कोणती आहेत हे जाणून घेउया.

  • भीम गर्जना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट आहेत. पण, यातील काही चित्रपट प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहणारे आहेत. यात एक म्हणजे ‘भीम गर्जना’ होय. सुधाकर वाघमारे दिग्दर्शित ‘भीम गर्जना’ हा चित्रपट 1989 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अभिनेते कृष्णानंद आणि अभिनेत्री प्रतिमा देवी यांनी मुख्य भूमिका साकारला होती.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित 2000 मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ विशेष गाजला आहे. हिंदीच नव्हे तर, इंग्रजी भाषेतही हा चित्रपट रिलीज झाला होता. सुप्रसिद्ध साऊथ अभिनेते मामुटी यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म श्रेणीमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते

  • जयंती

गेल्यावर्षी रिलीज झालेल्या ‘जयंती’ या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुमोल विचारसरणीवर भाष्य करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांची संघर्ष गाथा एका वेगळ्या प्रकारात या चित्रपटात मांडण्यात आली होती. तितिक्षा तावडे, मिलिंद शिंदे, किशोर कदम यांसारख्या मातब्बर कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होती.

  • डॉ. बी. आर. आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधािरत चित्रपट हे केवळ मराठीच नाही तर हिदी आणि साऊथमध्येही रिलीज झाले आहे. 2005 मध्ये आलेल्या ‘डॉ. बी. आर. आंबेडकर’ या कन्नड चित्रपटाला (Movie) देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. साऊथ अभिनेते विष्णुकांत यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. तर, अभिनेत्री तारा यांनी रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली होती.

  • रमाई भीमराव आंबेडकर

‘रमाई भीमराव आंबेडकर’ या मराठी चित्रपटात (Marathi Movie) देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संघर्षमय जीवनाचे चित्रण करण्यात आले होते. 2011 मध्ये रिलीज झालेल्या या मराठी चित्रपटात अभिनेत्री निशा परुळेकर, अभिनेते गणेश जेठा आणि दशरथ हातिसकर या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT