Madhuri Dixit's Son cook Dal khichadi for her : 'धक धक करने लगा' जोरा जोरी चने के खेत मे यांसारख्या गाण्यांमधून आणि अनेक चित्रपटांतून आपल्या घातक अदांनी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकविणाऱ्या माधुरी दिक्षितला कोण विसरेल?
90 च्या दशकात आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने माधुरीने चाहत्यांसह इंडस्ट्रीवर राज्य केलं. राम - लखन, दिल, खलनायक, प्रेमग्रंथ, दिल तो पागल है, देवदास अशा अनेक चित्रपटांतून माधुरीने आपल्या अभिनयाने सर्वांना दिपवून टाकले. सध्या माधुरी पती डॉ. श्रीराम नेने आणि दोन मुलांसह अमेरिकेत स्थायिक झाली आहे.
सध्या माधुरी पडद्यापासुन दूर असली तरीही तिच्या चित्रपटांची आणि डान्स स्टेपची जादू चाहत्यांसाठी जशीच्या तशी कोरलेली आहे. माधुरी आपला मुलगा रायन आणि अरिन यांच्यासोबत वेळ घालवताना दिसत आहे.
माधुरीचा मुलगा अरीन सध्या कॉलेजात शिकत आहे त्याने केलेल्या दाल खिचडीच्या रेसीपीवर माधुरी चांगलीच खुश झाली आहे.
माधुरीचा मुलगा अरीन आणि पती डॉ नेने यांन किचनचा ताबा घेत काही रेसिपी करण्याचे ठरवले आणि त्यांनी माधुरीला चकित केले. नुकतेच माधुरी डॉ नेने आणि मुलगा अरिन भारतात आले तेव्हा यांनी माधुरीला डाळ खिचडीचं स्वादिष्ट सरप्राईज दिलं आहे.
माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने हे रक्तवहिन्यासंबंधी आणि शल्यचिकित्सक आहेत. डॉ नेने कधीकधी त्यांच्या YouTube चॅनेलवर काही सोप्या पण स्वादिष्ट पदार्थ बनवतात.
11 मिनिटांत, दोघांनीही त्यांनी डिश कशी तयार केली ते तपशीलवार दाखवले, ज्याचे वर्णन डॉ नेने यांनीही 'भारतीय पायला' म्हणून केले.
अरिनने डिश सर्व्ह करताच,माधुरी आली आणि तिने दालखिचडीचा पहिलाच घास घेतला. तिने अगदी अभिमानी आईप्रमाणे तिच्या मुलाच्या स्वयंपाक कौशल्याची प्रशंसा केली आणि म्हणाली, "तू जेव्हा मित्रांसाठी ही रेसिपी बनवशील तेव्हा तुझे मित्र आणि रूममेट खूप आनंदी होतील."