Tillotama Shome- Jaya Bachchan Dainik Gomantak
मनोरंजन

Tillotama Shome: 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये झळकलेली तिलोत्तमा शोम अन् जया बच्चन यांच्यामध्ये काय आहे संबंध?

Tillotama Shome: 8 वर्षाच्या रिलेशननंतर त्यांनी 2015 मध्ये गोव्यात लग्नगाठ बांधली होती.

दैनिक गोमन्तक

Tillotama Shome: सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अनेक शो प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी देत आहेत. वेगळ्या धाटणीचे विषय, प्रेक्षकांच्या काळजाला हात घालेल अशी विषयाची मांडणी आणि कौतुक करायला भाग पाडतील असा अप्रतिम अभिनय यामुळे सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठी पसंती मिळाली आहे.

गेल्या काही काळापासून मोठ्या बजेटचे अनेक चित्रपटदेखील थिएटर ऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज झालेले पाहायला मिळत आहेत.

अलिकडेच ओटीटीवर रिलिज झालेली लस्ट स्टोरीज 2 ही वेब सीरीज चांगलीच चर्चेत आहे. आर बल्की, सुजॉय घोष, अमित रविंद्रनाथ शर्मा, कोंकणा सेन शर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या या वेबसीरीजला प्रसिद्धा कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने न्याय दिल्याचे दिसून आले आहे.

बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री काजोल, मृणाल ठाकूर, तमन्ना भाटिया, तिलोत्तमा शोम, अमृता सुभाष अशा अनेक गुणी अभिनेत्री या वेब सीरीजमध्ये दिसून आल्या आहेत. या वेबसीरीजमधील प्रत्येकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

लस्ट स्टोरीज 2 मध्ये दिसून आलेली अभिनेत्री तिलोत्तमा शोम आणि जया बच्चन यांच्यामध्ये खास संबंध असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहीतीनुसार जया बच्चन यांचा भाचा कुणाल रोसबरोबर तिलोत्तमाने लग्न केले आहे.

कुणाल आणि तिलोत्तमा एका पार्टीत भेटले होते. तिलोत्तमाने एका मुलाखतीत आपल्या नात्यावर बोलताना म्हटले होते की, जेव्हा मी पहिल्यांदा कुणालला पाहिले होते तेव्हा त्याच्यात मला खरेपणा दिसला होता आणि त्याचा स्वभावदेखील हसताखेळता आहे.

कुणाल बिझनेसमॅन असून आपल्या करिअरची सुरुवात अॅडव्हरटाइज प्रोफेशनल म्हणून सुरुवात केली होती. 8 वर्षाच्या रिलेशननंतर त्यांनी 2015 मध्ये गोव्यात लग्नगाठ बांधली होती. यावेळी संपूर्ण बच्चन कुटुंबाने हजेरी लावली होती.

दरम्यान, तिलोत्तमा शोमने 'लस्ट स्टोरीज 2' शिवाय अंग्रेजी मिडियम, मंटो, आत्मा, कड़वी हवा, चिंटू का बर्थडे, द नाइट मॅनेजर, सर, टूथ परी, किस्सा, दिल्ली क्राइम, मॉनसून वेडिंग अशा चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे. महत्वाचे म्हणजे, तिच्या भूमिकांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळत आहे. 2011 मध्ये अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT