Lara Dutta play role of Indira Gandhi in Bell Bottom Dainik Gomantak
मनोरंजन

लारा दत्ताने 'बेल बॉटम' मध्ये अशी साकारली इंदिरा गांधींची भूमिका

'बेल बॉटम' चित्रपटात लारा दत्ता भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : अक्षय कुमार (Akshay Kumar), वाणी कपूर आणि लारा दत्ता यांचा 'बेल बॉटम' (BellBottom) चित्रपट 19 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे चित्रपटगृहे बंद होती, पण आता ती सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला मोठा चित्रपट म्हणजे 'बेल बॉटम'. (Lara Dutta play role of Indira Gandhi in Bell Bottom)

या चित्रपटात लारा दत्ता भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्याची झलक दिसली असून तीचा हा लूक सोशल मीडियावरही चांगलाच पसंत केला जात आहे.

अक्षय कुमारने लारा दत्ताचा व्हिडिओ शेअर केला

या व्हिडिओमध्ये लारा दत्ता इंदिरा गांधींच्या भूमिकेसाठी तयार होताना दिसत आहेत, ती लगेचच इंदिराजींच्या पात्रात परफेक्ट उतरलेली दिसते. हा व्हिडिओ शेअर करताना अक्षय या पोस्ट ला कॅप्शनही दिले आहे, 'एखाद पात्र खऱ्या आयुष्यात साकारताना कस दिसते ... लारा दत्ता, तु ते केलय आणि तेही' बेल बॉटम' मध्ये. 19 ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर 3Dमध्ये पहा बेल बॉटम.'

लारा दत्ताची प्रतिक्रिया

अक्षय कुमारच्या या ट्विटला उत्तर देताना लाराने लिहिले, अक्षय, तो किती मजेदार, रोमांचक आणि आव्हानात्मक शूट होता. हसणं, मिठी मारणं आणि माझ्यावर सतत विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद !' अशाप्रकारे, लारा दत्ता 'बेल बॉटम' मध्ये पूर्णपणे नवीन भुमिकेत दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT