Kolkata: Short films on homosexual relationships, wilk be screened in schools Dainik Gomantak
मनोरंजन

कोलकातांच्या शाळांमध्ये प्रदर्शित केले जातील समलैंगिक संबंधांवरील लघुपट

सलीम शेख यांच्या मते, त्यांच्या ' देखा ' या चित्रपटात समलैंगिक (gay) मुलगा त्याच्या वडिलांच्या भेटीच्या शोधात असतो

दैनिक गोमन्तक

सलीम शेख, मनीष चौधरी, सप्तर्षी रे आणि अविजित मर्जीत या चार जणांनी या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. शेख यांनी 'द्वितियो पुरुष', 'देखा' आणि 'दख्खिना' या तीन लघुपटांचे दिग्दर्शन केले होते, तर चौधरी यांनी 'धोरा पोरे घेची आमी', 'दत्तो ' आणि 'देया निया' या चित्रपटांचे शूटिंग केले होते. सप्तर्षी रे यांनी 'डरबिन' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते आणि अविजित मर्जीत यांनी 'डंबेल' चे दिग्दर्शन केले होते. हे चारही दिग्दर्शक प्रसायम व्हिज्युअल बेसिक्स नावाच्या UNICEF आणि Adobe समर्थित स्टुडिओचे विद्यार्थी आहेत. हे 8 लघूपट बॅड अँड ब्युटीफुल वर्ल्ड फेस्टिव्हलसाठी निवडले गेले होते आणि ते आता शाळा उघडल्यानंतर कोलकातामधील शाळांमध्ये दाखवण्यात येणार आहेत.

सलीम शेख यांच्या मते, त्याच्या ' देखा' या चित्रपटात समलैंगिक (gay) मुलगा आणि त्याच्या वडिलांच्या भेटीच्या शोधात असतो. त्याचा दुसरा चित्रपट, दक्षिणा हा पुरुष एस्कॉर्टच्या प्रतिष्ठेवर आधारित आहे. शेख 23 वर्षांचा तरूण आहे आणि त्याचे म्हणणे असे आहे की , “माझे काही मित्र जे पुरुष एस्कॉर्ट आहेत त्यांनी आग्रह धरला की त्यांच्यासाठी स्वाभिमान खूप महत्त्वाचा आहे. हा चित्रपट बनवून, मला त्यांच्या जीवनाच्या निवडीबद्दल त्यांच्या स्वाभिमानाबद्दल समाजात असलेला समज मोडीत काढायचा होता.” मनीष चौधरीचा दिया हा लघूपट एक अपरिचित व्यक्ती आणि फूड डिलिव्हरी बॉय यांच्यातील नातेसंबंध आणि वर्गीय भेदांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर आधारित आहे.

ते म्हणाले, "फक्त 15 मिनिटांत, अशा संबंधांबाबात सामाजिक-आर्थिक अडथळे आणि मोठ्या समस्या कशा निर्माण होताता हे शोधण्याचा मी प्रयत्न केला आहे." सप्तर्षी रे यांच्या डरबिन लघूपटांमध्ये एका पत्रकाराने त्याच्या लिव्ह-इन-पार्टनरला त्याच्या वडिलांच्या निधनानंतर आणि त्याच्या गुपितांबद्दल माहिती झाल्यानंतर आलेल्या संकटाबद्दलची माहिती त्याने या चित्रपटात दिली आहे. त्याने असा दावा केला की, “ही कथा ऐकून या लघूपटात काम करणारे कलाकार परत गेले. म्हणूनच या लघुपटांचे प्रदर्शन करणे अधिक महत्त्वाचे झाले आणि मी ते केले जेणेकरून समाजातून हे प्रतिबंध दूर होतील.”

या प्रकरणाविषयी बोलताना, प्रस्यमचे संचालक प्रशांत रॉय म्हणाले, “स्क्रीनिंगचा मुख्य उद्देश समावेशक शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा आहे. जेणेकरून LGBTQ तरुणांना हा समाज वेगळा किंवा नकोसा वाटू नये.” टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या अहवालानुसार या लघुपटात समलिंगी संबंधांवर प्रकाश टाकणाऱ्या काल्पनिक कथांचे चित्रण केले आहे आणि आपली ओळख, येणारे संकट, बाल शोषण, सहवास आणि बरेच काही यासारखे विषय या लघूपटातून मांडण्यात आले आहे. पुढील महिन्यात 3 डिसेंबर रोजी कालांजली आर्ट स्पेस येथे या चित्रपटांचा प्रीमियर होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: नशिबाचा तारा चमकणार! सूर्य-गुरुची दुर्मिळ युती 'या' 5 राशींना करणार मालामाल; करिअरमध्ये प्रगती अन् पदोन्नतीचा योग

IND vs SA 4th T20: लखनौत टीम इंडियाला मोठा झटका! उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; कोणाला संधी?

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa News: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

SCROLL FOR NEXT