Coffee with Karan 8th seoson Dainik Gomantak
मनोरंजन

Koffee With karan: 'कॉफी विथ करणच्या' ८ व्या सीझनमध्ये दिसणार कलाकारांच्या 'या' जोड्या

Koffee With karan: त्यासाठी त्यांनी शूटिंग केल्याची माहीती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Koffee With karan: करण जोहर त्याच्या चॅट शो 'कॉफी विथ करण'च्या आठव्या सीझनसह परतत आहे. हा शो 26 ऑक्टोबरपासून OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलिज होणार आहे. 'कॉफी विथ करण 8'चा प्रोमो रिलिज झाल्यापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे की यावेळी कोणते सेलेब्स शोमध्ये येणार आहेत? कोणती जोडी करण जोहरसोबत कॉफी पिण्यासाठी जाईल आणि मनोरंजक खुलासे करेल याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

करण जोहरने 'कॉफी विथ करण 8' मध्ये कोणत्या सेलिब्रिटींना आमंत्रित करणार आहे हे अजून निश्चित झाल्याची माहीती समोर आले आहे, परंतु काही जोडप्यांच्या नावांची चर्चा केली जात आहे. जवळपास सहा सेलिब्रिटी जोडप्यांची नावे निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. असे म्हटले जात आहे की त्याने कॉफी विथ करण 8 साठी देखील शूटिंग केले आहे.

1. आलिया भट्ट- करीना कपूर खान

आलिया भट्ट आणि करीना कपूर( Kareena Kapoor ) खान 'कॉफी विथ करण 8' मध्ये एकत्र दिसणार आहेत. करीना आणि आलियाने नुकतीच एकत्र एक जाहिरात केली होती, ज्यामध्ये दोघांनाही चांगलीच पसंती मिळाली होती. आता ती करण जोहर( Karan Johar )च्या चॅट शोमध्येही येणार असल्याची बातमी आहे. त्यासाठी त्यांनी शूटिंग केल्याची माहीती समोर आली आहे.

2. रणवीर सिंग- दीपिका पदुकोण

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनीही 'कॉफी विथ करण 8'साठी शूटिंग केले असल्याचे म्हटले जात आहे.

3. रोहित शेट्टी- अजय देवगण

'कॉफी विथ करण 8' मधील तिसरी जोडी म्हणजे अजय देवगण आणि रोहित शेट्टी. बॉलिवूडच्या या हिट जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट एकत्र दिले आहेत. दोघांनीही चित्रपटसृष्टीत जवळपास एकत्रच आपल्या करिअरची सुरुवात केली.

अजय देवगण आणि रोहित शेट्टी सध्या 'सिंघम अगेन'चे शूटिंग करत आहेत. या दोघांनी याआधीच 'कॉफी विथ करण 8'साठी शूटिंग केल्याचे सांगितले जात आहे.

4. शाहरुख खान

करण जोहरच्या चॅट शोमध्ये शाहरुख खान येणार की नाही अशी चर्चा प्रत्येक वेळी होते. यावेळीही चाहत्यांच्या मनात हाच प्रश्न आहे. शाहरुख आणि करणचे खूप घट्ट नाते आहे आणि त्यामुळे तो 'कॉफी विथ करण 8' मध्ये येण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

5. आलिया आणि रणबीर होणार खास पाहुणे!

'कॉफी विथ करण 8'मध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूरही दिसणार असल्याची चर्चा आहे. करण जोहरने अलीकडेच खुलासा केला होता की तो त्याच्या शोमध्ये नुकतेच लग्न झालेल्या एका बॉलिवूड जोडप्याला खास पाहुणे म्हणून आमंत्रित करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

SCROLL FOR NEXT