KKBKJ Vs Ponniyin Selvan Dainik Gomantak
मनोरंजन

KKBKJ Vs Ponniyin Selvan : सलमानवर काय वेळ आली? एकेकाळी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं आज तीच तगडी काँम्पिटिशन देतेय

Rahul sadolikar

सलमान खान आणि ऐश्वर्याचं प्रेम कुणाला आजही चर्चेचा विषय ठरतंय. आजही जेव्हा दोघे एकमेकांसमोर येतात तेव्हा सोशल मिडीयावर त्याची चर्चा सुरू होते. सलमान आजही ऐश्वर्याला विसरला नसल्याचं कित्येकदा त्याच्या बोलण्यावरुन वाटतं . आता हीच ऐश्वर्या एक कट्टर स्पर्धक म्हणुन त्याच्या समोर आली आहे.

KKBKKJ बॉक्स ऑफिस डे 12 कलेक्शन सलमान खानचा फिल्म किसी का भाई किसी की जान बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. मंगळवारी त्याच्या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली आणि आता ऐश्वर्याचा चित्रपट हिंदी पट्ट्यात त्याला टक्कर देत आहे.

सलमान खानसाठी स्वतःच्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडणे कठीण झाले आहे. त्याच्या ईदला प्रदर्शित झालेल्या 'किसी का भाई, किसी की जान' या चित्रपटाने चांगली ओपनिंग केली होती, पण आता देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची गती मंदावली आहे.

भाईजानच्या चित्रपटाने आपला दुसरा वीकेंड पार केला आहे आणि दिवसेंदिवस चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट होत आहे. वीकेंडला हा चित्रपट आपली पकड मजबूत करू शकला नाही, परंतु याशिवाय कामाच्या दिवसांचा परिणामही चित्रपटाच्या कमाईवर स्पष्टपणे दिसून आला.

Aishwarya Rai

रविवारी 4 कोटींचा व्यवसाय करणाऱ्या 'किसी का भाई, किसी की जान'ने सोमवारी केवळ 2.61 कोटींचा व्यवसाय केला. याशिवाय मंगळवारी कामकाजाच्या दिवशी सलमान खानच्या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी घट झाली. ही घट चिंताजनक आहे. आणि याचवेळी सलमानला चक्क ऐश्वर्याशी स्पर्धा करावी लागत आहे.

Salman Khan

'किसी का भाई, किसी की जान'ने मंगळवारी एकूण 1.61 कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटाला देशांतर्गत आणि जगभरात मागे टाकल्यानंतर आता ऐश्वर्या रायचा चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन-2' सलमान खानच्या 'किसी का भाई, किसी की जान' या चित्रपटाला हिंदी पट्ट्यातही तगडी टक्कर देत आहे. मंगळवारी या चित्रपटाने एकाच दिवशी हिंदी भाषेत एकूण 1.12 कोटींचा व्यवसाय केला आहे.

किसी की भाई, किसी की जानने आतापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 104.11 कोटींची कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 174 कोटी इतके आहे. या चित्रपटात सलमान खानला साऊथ स्टार्सचाही पूर्ण पाठिंबा मिळाला होता. या चित्रपटात व्यंकटेश आणि जगपती बाबू महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT