Amitabh Bachchan in KBC Dainik Gomantak
मनोरंजन

KBC 15 : 25 लाखांच्या त्या प्रश्नाने स्पर्धकासहित सगळ्यांनाच गोंधळात टाकलं... त्याचं उत्तर माहितेय?

टेलिव्हिजन विश्वातला सगळ्यात प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपतीचा 15 वा सीजन प्रचंड चर्चेत आहे. सध्या मधुरिमा नावाच्या स्पर्धकाला विचारलेला 25 लाखांचा प्रश्न आणि त्याचं उत्तराची जोरदार चर्चा सुरू आहे.

Rahul sadolikar

सध्या टेलिव्हीजन इंडस्ट्रीतला सर्वात पॉप्युलर शो कोणता? असा प्रश्न विचारला तर 'बिग बीं'चा कौन बनेगा करोडपती असं उत्तर कुणीही देईल.

KBC चा 15 वा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी अनेक स्पर्धक शोचा भाग होत आहेत आणि आपले अनुभव आणि गमतीजमती बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी शेअर करत आहेत.

सध्या सोशल मिडीयावर KBC च्या मधुरिमा नावाच्या स्पर्धकाची चर्चा सुरू आहे. त्यांना विचारलेला 25 लाखांसाठीचा प्रश्न आणि त्याचं उत्तर काय असावं यावर नेटीजन्समध्ये कमालीची उत्सुकता आहे.

अमिताभ बच्चन आणि KBC

प्रत्येक सीझनसारखा KBC चा 15 वा सीझनही अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan in Kaun Banega Crorepati ) यांच्या अनोख्या शैलीमुळे आणि स्पर्धकांच्या वेगवेगळ्या अनुभवांनी आणि रंजक गोष्टींमुळे चर्चेत आहे.

25 लाखांचा प्रश्न

KBC च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका एपिसोडमध्ये एका स्पर्धकाला 25 लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. पण तुम्हाला बरोबर उत्तर माहित आहे का? 'कौन बनेगा करोडपती सीझन 15' सध्या मधुरिमा नावाच्या स्पर्धकामुळे चर्चेत आहे. 

मधुरिमाचे उत्तर

KBC च्या या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या एपिसोडमध्ये स्पर्धक मधुरिमा हॉटसीटवर बसल्या होत्या . सुरूवातीचे दोन टप्पे त्यांनी सहज पार केले. आणि 3 लाख 20 हजारांच्या 10 व्या प्रश्नापर्यंत पोहोचले. 

तो कठीण प्रश्न

या स्पर्धेत बिग बींनी विचारले की, 'नमोह 108 सीएसआयआरने तयार केले आहे, तर ही फुलांची कोणती नवीन प्रजाती आहे?' यावर स्पर्धकाने उत्तर दिले - कमल. इतक्या कठीण प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर मधुरिमा पुढच्या टप्प्याकडे वळाल्या.

या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिल्यानंतर अमिताभ बच्चन त्यांना चेक देतात आणि शेकहँड करतात आणि अभिनंदन करतात. यांनंतर बिग बी या पैशाचे ती काय करणार असे विचारतात, स्पर्धक सांगते की ती जिंकलेली रक्कम तिच्या नवीन घराच्या बांधकामात वापरेल.

स्पर्धकाने सांगितली

स्पर्धक मधुरिमा यांनी आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलताना सांगितले की, त्या सध्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहते. त्या कर्ज घेऊ शकतात पण ते फेडणे त्यांना खूप महागात पडेल.

 त्यांच्या आईने त्यांना लहानपणापासून दोन गोष्टी शिकवल्या, ज्या गोष्टा मधुरिमा नेहमी पाळतात . घरात कधीही भांडण करू नये कारण लक्ष्मी आणि शांती दोन्ही येत नाहीत. 

आपल्याजवळ जे काही आहे त्यातच जगायला शिका. आपल्या मुलींनी कर्ज घेऊन लग्न करु नये असेही मधुरिमा म्हणाल्या. हुंडा आणि कर्ज न घेता तिन्ही बहिणींचे लग्न झाले.

25 लाखांचा प्रश्न आणि 2 लाईफलाईन

थोड्या संवादानंतर खेळाला पुढे नेत, बिग बी त्यांना 6 लाख 40 हजारांचा प्रश्न विचारतात, 'राष्ट्रपतीची जागा रिक्त झाल्यास भारताचे उपराष्ट्रपती भारताचे कार्यवाह राष्ट्रपती म्हणून किती काळ काम करू शकतात?' यावर उत्तर देताना मधुरिमा म्हणाली 6 महिने. या योग्य उत्तरानंतर बाराव्या प्रश्नापर्यंत पोहोचली.

 त्याचेही असेच उत्तर दिले आणि त्यानंतर 25 लाख रुपयांसाठी 13 वा प्रश्न आला. या प्रश्नापर्यंत त्यांच्याकडे दोन लाईफलाईन होत्या. डबल डिप आणि व्हिडीओ कॉल टू फ्रेंड.

25 लाखांचा प्रश्न

मधुरिमा यांना कोड्यात टाकणारा हा प्रश्न नेमका काय होता? बिग बींनी मधुरिमाला विचारले की रघुवंशी आणि पांचाल ही कोणत्या संगीतकार जोडीची आडनावे आहेत?
A- कल्याण जी आणि आनंद जी
B- लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल
C- शंकर आणि जयकिशन
D- आनंद आणि मिलिंद

पुढे काय झालं

या प्रश्नाचे उत्तर देणे मधुरिमाला कठीण गेले. त्यासाठी त्यांनी लाईफलाईनचा वापर केला. प्रथम त्याने व्हिडिओ कॉल केला, परंतु तेथून त्याला योग्य उत्तर मिळाले नाही. मग त्याने डबल डिप देखील वापरले. 

मात्र, तिची चूक होत असल्याने अमिताभने तिला खेळ सोडण्यासही सांगितले. पण त्यांनी क्विट केलं नाही. त्यानंतर अमिताभ यांनी त्यांना पर्याय निवडण्यास सांगितले. 

यानंतर मधुरिमा म्हणाल्या योग्य उत्तर सी आहे. अशा परिस्थितीत मधुरिमा 3 लाख 20 हजार रुपयांच्या टप्प्यावर येतात कारण हे उत्तर अयोग्य ठरतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT