Katrina Kaif and Salman Khan and Rohit Shetty Dainik Gomanatk
मनोरंजन

कतरिनाने केले सलमान वर आरोप

बिग बॉस शो ने कायमच प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे

दैनिक गोमन्तक

बिग बॉस 15 शो मध्ये रोज नवनवे ट्विस्टस पाहायला मिळतात. अलीकडेच विकेंडचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये कतरिना कैफ (Katrina Kaif) ने सलमान खानवर (Salman Khan) आरोप केला आहे असे व्हिडियो मध्ये दिसुन येत आहे. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या आगामी 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) चित्रपटाच्या प्रमोशन साठी शो मध्ये आली आहे. अभिनेत्रीसोबत शो मध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) देखील दिसुन आले आहेत. या शोचा विकेंड प्रोमो सोशल मिडिया वरती तुफान व्हायरल होत आहे.

प्रोमोमध्ये कतरिना सलमान आणि रोहित सोबत स्टेजवर गेम खेळताना दिसुन येत आहे. ज्यामध्ये रोहित जजची भूमिका साकारत आहे. कतरिनाने सलमानवर आरोप केला आहे की, शूटवर तो नेहमीच दुरून येतो (''ये शूट पे दूरसे आते हैं''). यावर सलमानने कबुली दिली आहे.

यानंतर कतरिना सलमानला म्हणते की माझ्यासाठी एक गाणे गा आणि सलमान त्याच्या मजेदार डान्स मूव्ह्स दाखवत 'ओ मेरे दिल के चैन' गाण्यावरती थीरकतो, जे बघुन सगळे प्रेक्षक हसू लागतात. कतरिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्रीने वीकेंड वार मध्ये तिच्या सुंदर लूकची काही छायाचित्रे देखील सोशलमिडिया वरती शेअर केले आहेत.

याआधी प्रोमोमध्ये सलमान शमितावर रागावलेला दिसुन येतो आणि म्हणतो की, माझ्या हातात असत तर मी हा एपिसोड सायलेंटमध्ये चालवला असता आणि मी आज शो मध्ये आलोही नसतो. सलमान शमिताला म्हणतो की तू स्वतःला राणी मानतेस का, यावर शमिता म्हणते, मी काय करू, माझा जन्म असाच झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT