Jee Le Zara Postponed Dainik Gomantak
मनोरंजन

Jee Le Zara: प्रियंका चोप्रापाठोपाठ कतरिनादेखील बाहेर; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींची लागणार वर्णी

Jee Le Zara: आता या कास्टिंगबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Jee Le Zara: बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता फरहान अख्तर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. जी ले जरा या चित्रपटामुळे सध्या फरहान अख्तर सध्या चर्चांचा भाग बनला आहे. बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा, प्रसिद्ध अभिनेत्री कतरीना कैफ आणि आपल्या अभिनयाने भूरळ पाडणारी आलिया भट्ट या तीन अभिनेत्रींचे या चित्रपटासाठी कास्टिंग झाले होते. मात्र आता या कास्टिंगबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, प्रियंका चोप्राने हा चित्रपट सोडला आहे. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटात ज्याप्रमाणे रोड ट्रिप दाखवण्यात आली आहे. तशाच प्रकारे 'जी ले जरा' मध्ये मुलींची रोड ट्रिप दाखवण्यात येणार आहे.

प्रियंका चोप्रानेच या चित्रपटाची आयडिया फरहान अख्तर आणि झोया अख्तर यांना दिली होती. मात्र चित्रपटाच्या शुटिंगला सातत्याने होत असलेल्या वेळामुळे प्रियंकाच्या इतर चित्रपटांच्या तारखा आणि जी ले जरा च्या तारखा क्लॅश होत असल्या कारणाने अभिनेत्रीने हा चित्रपट सोडल्याचे म्हटले जात आहे.

कतरिनाने सोडला चित्रपट

महत्वाचे म्हणजे प्रियंका चोप्रा पाठोपाठ कतरीना कैफनेदेखील हा चित्रपट सोडल्याची माहीती समोर आली असून चाहते आता प्रचंड नाराज झाले आहेत.

असेही म्हटले जात आहे की, प्रियंका चोप्रा आणि कतरीनाच्या जागी कियारा अडवाणी आणि अनुष्का शर्मा दिसून येणार आहेत. जेव्हा फरहान अख्तरने जी ले जरा चित्रपटाची घोषणा केली होती तेव्हापासून चाहत्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. आता मात्र कास्टिंगमुळे फरहान अख्तर समस्यांचा सामना करत असतानाच चाहत्यांमध्ये नाराजगी दिसून येत आहे.

दरम्यान, फरहान अख्तरचा डॉन ३ हा चित्रपटदेखील मोठ्या चर्चेत आहे. या चित्रपटात शाहरुख खानला रणवीर सिंहने रिप्लेस केल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, जी ले जरा चित्रपटाच्या आधी डॉन ३ चे शुटिंग सुरु होऊ शकते. त्यामुळे रामायण आणि बैजू बावरा चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसून येणार असलेली आलिया भट्ट देखील चित्रपट सोडू नये असे म्हटले जात आहे.

2024 मध्ये जी ले जरा चे शुटिंग सुरु होऊ शकते. दरम्यान, याबाबतीत फरहान अख्तर किंवा त्यांच्या प्रोडक्शन हाऊस कडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT