katrina kaif brother dating superhot superbold actress Dainik Gomanatak
मनोरंजन

Katrina Kaif Brother: बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करतेय कतरिना कैफच्या भावाला डेट

लवकरच होऊ शकते कतरिनाची वहिनी

दैनिक गोमन्तक

कतरिना कैफच्या भावाचे नाव प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे. या अभिनेत्रीची गणना बॉलिवूडमधील सर्वात हॉट आणि बोल्ड हिरोइन्समध्येही केली जाते. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या विकी कौशल आणि मित्रांसोबत मालदीवमध्ये तिच्या वाढदिवसाच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. कतरिनाच्या 39 व्या बर्थडे सेलिब्रेशनचे अनेक फोटो तिने आणि तिच्या मित्रांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हेकेशनचे फोटो समोर येताच कतरिना कैफच्या भावाच्या प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. वास्तविक, सुट्टीतील असे काही फोटो समोर आले आहेत, ज्यानंतर कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनचे प्रसिद्ध अभिनेत्रीसोबतचे नाते चर्चेचा विषय ठरले आहे.

सेबॅस्टियन या अभिनेत्रीला करत आहे डेट

कतरिनाची वहिनी होणार्‍या या अभिनेत्रीबद्दल सर्वांना जाणून घ्यायची उत्सुकता आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून इलियाना डिक्रूझ आहे, ती बॉलीवूडच्या सर्वात हॉट आणि बोल्ड हिरोईनपैकी एक आहे. आजकाल इलियाना कतरिनाची वाढदिवसानिमित्त मालदीवमध्ये आहे. सेलिब्रेशनच्या फोटोंमध्ये इलियाना आणि सेबॅस्टिन दोघेही एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहेत.

इलियानाने इन्स्टाग्रामवर फोटो केले शेअर

इलियानाने स्वतः तिच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून हा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमुळे इलियाना आणि सेबॅस्टियनच्या नात्याची चर्चा रंगली आहे. बर्फी, रुस्तम आणि मैं तेरा हिरो फेम अभिनेत्री इलियाना डिक्रूझ तिच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमावर विश्वास ठेवताना दिसत आहे.

इलियाना सिनेसृष्टीपासून दूर

इलियाना डिक्रूझ सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. इलियाना तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. कतरिनाचा भाऊ शेवटचा त्याच्या बहिणीच्या लग्नात मुंबई आणि राजस्थानमध्ये दिसला होता. गेल्या सहा महिन्यांपासून इलियाना आणि सेबॅस्टियन रिलेशनशिपमध्ये असल्याचेही बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT