Katrina Kaif and Vicky Kaushal will be Neighbors to Virat Kohli and Anushka Sharma  Dainik Gomantak
मनोरंजन

विराट-अनुष्काचे शेजारी होणार कटरीना-विक्की

ज्या ठिकाणी मागीलवर्षी विराट कोहली आणि अनुष्का शर्माने घर खरेदी केले आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: बॉलीवुड स्टार कटरीना कॅफ आणि विक्की कौशल (Katrina Kaif and Vicky Kaushal) यांच्या लग्नाच्या बातमीची सद्या सोशल मिडियावर जोरदार चर्चा रंगत आहेत. मात्र कटरीना आणि विक्की दोघांनीही या चर्चेवर उत्तर देणे टाळले. परंतु मीडियामध्ये त्यांच्या लग्नाच्या तारीखेपासून ते वेन्यूपर्यंतच्या चर्चा होत आहेत. आता लग्नाच्या बातमीनंतर विक्की आणि कटरीना बदद्ल एक नविनच बातमी पुढे येते आहे.

एका वृत्तवाहिनीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिन्याआधी विक्की कौशल आणि कटरीना कॅफ जुहू येथिल एक हाई राइज बिल्डिंगमध्ये गेले होते. ज्या ठिकाणी मागीलवर्षी विराट कोहली आणि अनुष्का शर्माने (Virat Kohli and Anushka Sharma) घर खरेदी केले आहे.

त्यानंतर ते येथे अनेकवेळा आले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बिल्डींगमध्ये डिल फायनल झाली आहे. आणि लग्नानंतर ते दोघे याच अपार्टमेंटमध्ये राहणार असल्याचीही माहिती आहे. मात्र कटरीनाने या लग्नांच्या बातम्यांबद्दल बोलतांना या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या 15 वर्षापासून मी या प्रश्नांना सामोरे जाते आहे. त्यामुळे मला या अफवांबाबत काही अप्रुप वाटत नाही. आणि या सर्व बातम्या जशा आधी अफवा आहे म्हणून सिद्द झाल्यात तशाच आताही अफवाच आहेत हे लवकरच सिद्ध होइल असे उत्तर कटरीनाने दिले.

परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे की कटरीना कैफ आणि विक्की कौशलचे लग्न 7 ते 9 डिसेंबर दरम्यान राजस्थानमध्ये होणार आहे. आणि हे लग्न पंजाबी व कॅथलिक पद्धतीने होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT