Katrina Kaif and Rohit Shetty Dainik Gomantak
मनोरंजन

'माझी' इच्छा फक्त रोहित शेट्टी पूर्ण करू शकतो.

कॅटरीनाने रोहीत कडे केली ईच्छा पुर्तीची मागनी

दैनिक गोमन्तक

रोहिट शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित सूर्यवंशी चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला चाहत्यांकडुन चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अलीकडेच अक्षय कुमार (Akshay Kumar), रोहित शेट्टी आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) कपिल शर्माच्या (Kapil Sharma) द कपिल शर्मा शोमध्ये (The Kapil Sharma Show) प्रमोशन पोहोचले होते. यावेळी सर्वांनी प्रेक्षकांसोबत खूप मजा केली. यादरम्यान कतरिनाने रोहितला ''महिला लीड कॉप'' चित्रपट बनवायला सांगितला आहे, इतकेच नाही तर रोहितला चित्रपटात मुख्य भूमिकेत काम करायचे आहे, असेही कतरिनाने त्यावेळी सांगितले.

कपिल पुढे गंमतीने म्हणतो की, जर कतरिनाने रील लाइफमध्ये सूर्यवंशीला घटस्फोट दिला तर ती त्याच्या चित्रपटात काम करू शकते. कतरिनाला ही कल्पना खूप आवडली आणि तिने अर्चना पूरण सिंगला (Archana Puran Singh) महिला कॉप ड्रामा चित्रपटाचे नाव विचारले. त्याने अर्चनाला असेही सांगितले की चित्रपटाचे नाव S ने सुरू करावे कारण रोहितचे सर्व चित्रपट S ने सुरू होतात. अर्चनाने लगेच उत्तर दिले, स्वीटी. अर्चनाने हे नाव उच्चारताच कपिल शर्मा आणि अक्षय कुमारला हसू आवरता आले नाही. प्रेक्षकही खूप हसतात.

सूर्यवंशी चित्रपटातील कतरिनाच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. 'टिप टिप बरसा' या नव्या गाण्यामध्ये कतरिना बोल्ड लुक मध्ये दिसुन येत आहे. हे गाणं रवीना टंडन (Raveena Tandon) आणि अक्षय कुमार यांच्या हिट गाण्यांपैकी एक आहे. या नवीन व्हर्जनलाही चाहत्यांकडुन प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटानंतरही कतरिनाचे २ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. फोन भूत आणि टायगर 3 मध्ये दिसुन येणार आहे. फोन भूतमध्ये कतरिनासोबत सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि इशान खट्टर (Ishaan Khattar) यांच्या सोबत मुख्य भुमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर टायगर 3 मध्ये सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना मुख्य भूमिका निभावणार आहेत. दोघेही काही दिवसांपूर्वी तुर्कीहून शूटिंग करून परतले आहेत. कतरिना आणि सलमानला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

VIDEO: "याच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 पैसे कापा" मोहम्मद रिझवान अन् लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची; बांगलादेशी खेळाडूंनी उडवली खिल्ली

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' सरकारी कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; ओल्ड पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा

Horoscope 20 May 2026: चंद्राचे गोचर घडवणार चमत्कार! बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; व्यवसायातून होणार अफाट धनलाभ

SCROLL FOR NEXT