The kashmir files shortlist for oscars 2023 Dainik Gomantak
मनोरंजन

Oscar 2023: 'द काश्मीर फाइल्स' ची ऑस्कर 2023 मध्ये एंट्री

Oscar 2023: भारताकडून पाच चित्रपट ऑस्करकडे गेले आहेत. त्यात द काश्मीर फाइल्सचादेखील समावेश आहे.

दैनिक गोमन्तक

Oscar 2023: ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ठ चित्रपट जगभरातून येत असतात. भारतातूनदेखील दरवर्षी चित्रपट ऑस्करसाठी पाठवले जातात. २०२३ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी पाच चित्रपट पाठवले आहेत. यामध्ये द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला वेगवेगळ्या श्रेणींसाठी नामांकन मिळाले आहे.

त्याचबरोबर मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि अनुपम खेर यांची सर्वोत्कष्ठ अभिनेत्याच्या श्रेणीत निवड झाली आहे. विवेक अग्नीहोत्री यांनी ट्वीटरवरुन ही बातमी दिली आहे. भारताकडून पाच चित्रपट ऑस्करकडे गेले आहेत. त्यात द काश्मीर फाइल्सचादेखील समावेश आहे. या चित्रपटाशी संबंधित सगळ्यांचे विवेक अग्नीहोत्री यांनी आभार मानले आहेत.

ही फक्त सुरुवात आहे आणि अजून बरेच पुढे जायचे आहे असेही त्यांनी म्हटले आहे. द काश्मीर( Kashmir ) फाइल्स हा चित्रपट कमी बजेट चित्रपट असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटावरुन बराच वादही निर्माण झाला होता. त्याचबरोबर, या चित्रपटाची प्रशंसाही झाली होती. द काश्मीर फाइल्सने बॉक्स ऑफीसवर मोठी कमाई केली आहे.

अलिकडेच गोव्यात पार पडलेल्या इफ्फी महोत्सवादरम्यान द काश्मीर फाइल्स चित्रपटावरुन वाद पुन्हा निर्माण झाला होता. मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर अशा मोठ्या कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे.

याशिवाय ऋषभ शेट्टीने दिग्दर्शित केलेल्या कांतारा चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ चित्रपट आणि सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याच्या श्रेणीत नामंकन मिळाले आहे. नामंकन मिळाल्यानंतर ऋषभ शेट्टीनेसु्द्धा आपला आनंद व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT