Kareena Kapoor Khan Dainik Gomantak
मनोरंजन

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त करीना कपूरची खास पोस्ट

करीनाने 16 ऑक्टोबर 2012 रोजी सैफ अली खानसोबत लग्न केले. अभिनेत्रीने अलीकडेच त्यांच्या लग्नाच्या 9 व्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली होती.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) अनेकदा इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने एका फोनच्या ब्रँडची जाहिरात केली असून त्यातील काही फोटो शेअर केले. कॅप्शनमध्ये, बेबोने सांगितले की केवळ तिचे फोटोच नाही तर ती स्वतः देखील 'कथांनी भरलेली' आहे.

तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर फोटो शेअर करताना करीनाने लिहिले, "मी कथांनी परिपूर्ण आहे "दरम्यान तिच्या पोस्टवर कॉमेंट करताना, बेबोची मोठी वहिनी आणि सैफ अली खानची बहीण सबा अली खानने त्यावर कॉमेंट केली, "फॅब दिसते." तर अभिनेता करण सिंह छाबरा यांनी देखील कॉमेंट केली होती.

करीनाने 16 ऑक्टोबर 2012 रोजी सैफ अली खानसोबत लग्न केले. अभिनेत्रीने अलीकडेच त्यांच्या लग्नाच्या 9 व्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर तीने कॅप्शन करत म्हंटले, " एकेकाळी ग्रीसमधील या सूपच्या बाऊल ने माझे आयुष्य बदलले, जगातील सर्वात देखण्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा."

अलीकडेच, सैफ 'द कपिल शर्मा शो'च्या सेटवर दिसला तेव्हा त्याच्या लग्नाबद्दल बोलला. अभिनेत्याने कबूल केले की त्याने आणि करीनाने त्यांच्या लग्नात फक्त 'जवळच्या कुटुंबाला' आमंत्रित करण्याची योजना आखली होती. परंतु कपूर कुटुंबात किमान 200 लोक असल्याने हा प्लान फसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT