Karan Kundra in Goa Dainik Gomantak
मनोरंजन

Karan Kundra in Goa: गोव्याच्या किनारी अभिनेत्याचा दणक्यात वाढदिवस साजरा

Karan Kundra in Goa: आता त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहे. त्यांचे हे फोटो( Photo ) आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Karan Kundra in Goa: मोठ्या पडद्यावर दिसणारे कलाकार असो किंवा छोट्या पडद्यावर कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.

कधी ते त्यांच्या कामामुळे. कधी त्यांच्या सोशल मिडियावरील पोस्टमुळे तर कधी त्यांच्या वयामुळे हे कलाकार चर्चेत असतात.

आता टीव्ही कलाकार करण कुंदा आपल्या वाढदिवसामुळे चर्चेत आला आहे. गोव्यात त्याने आपला वाढदिवस दणक्यात साजरा केला आहे.

सोशल मिडियावर त्याने पोस्ट केलेले फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. करणने त्याची गर्लफ्रेंड आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशबरोबर आपला वाढदिवस साजरा केला आहे.

आपल्या ३९ व्या वाढदिवसानिमित्त करण आणि तेजस्वी गोव्यात होते. त्यांनी केक कट केला, सोबत जेवण केले. रात्री गोव्याच्या किनारी एकमेकांसोबत वेळही घालवला.

आता त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहे. त्यांचे हे फोटो( Photo ) आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची ओळख बीग बॉस १५ मध्ये झाली होती. याच शोमध्ये ते एकमेकांना आवडू लागले होते. त्यानंतरदेखील आजही सोबत आहे.

त्यांचे चाहते त्यांना कायमच सपोर्ट करताना दिसतात. करण आणि तेजस्वीची जोडी प्रेक्षकांना आवडत असल्याचे कमेंटवरुन दिसते.

दरम्यान, काही दिवसापूर्वी तेजस्वी प्रकाशदेखील कामातून ब्रेक घेऊन गोव्याला सुट्टीसाठी गेली होती. त्यावेळी तिने शेअर केलेले फोटोदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.

बीग बॉस( Bigg Boss ) १५ मध्ये असतानाच तिला प्रसिद्ध मालिका नागिन साठी मुख्य भूमिकेसाठी विचारले होते.

तिच्या या मालिकेतील भूमिकेला देखील चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. याबरोबरच, करण कुंद्रा भूमी पेडणेकरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या थँक्यू फॉर कमिंग या चित्रपटात दिसून आला होता. आता तेजस्वी आणि करण कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT