Kapil Sharama Dainik Gomantak
मनोरंजन

Kapil Sharma : कपिल शर्मा: अभिनयानंतर आता कपिल गाणार, गुरू रंधावासोबत करणार काम...

विनोदी अभिनेता कपिल शर्मा आता गाणं गाणार आहे, इंन्स्टाग्रामवर नुकतंच एक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

Rahul sadolikar

'द कपिल शर्मा शो'च्या माध्यमातुन घराघरात पोचलेला आणि विनोदाची पक्की टायमिंग जमलेला कपिल शर्मा आता गाणार आहे. कॉमेडी आणि अभिनयानंतर कपिल आता गायनाच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. यासाठी कॉमेडियनने प्रसिद्ध गायक गुरु रंधावासोबत काम करण्याची घोषणा केली आहे.

. याबाबत त्यांनी औपचारिक घोषणा केली आहे. यासाठी कपिलने प्रसिद्ध गायक गुरु रंधावासोबत हातमिळवणी केली आहे. कपिलच्या पहिल्या गाण्याचे नाव 'अलोन' असे ठेवण्यात आले आहे. कपिल आणि रंधावाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. 

आपल्या कॉमेडीद्वारे कपिल शर्माने लोकांच्या हृदयात एक खास ओळख निर्माण केली आहे. त्याचे कॉमेडी टायमिंग अप्रतिम आहे. आपल्या शोच्या माध्यमातून तो लोकांना पोट धरून हसवतो. कपिल शर्मानेही फिल्मी दुनियेत नशीब आजमावले आहे.

 'किस किसको प्यार करूं' आणि 'फिरंगी' यांसारख्या चित्रपटांतील त्याच्या अभिनयाची लोकांनी प्रशंसा केली आहे. आता कपिल त्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे.

या गाण्याशी संबंधित एक पोस्टर दोघांनी शेअर केले आहे, ज्यामध्ये गाण्याचे टायटल लिहिले आहे. कपिल आणि रंधावा दोघेही डॅशिंग दिसत आहेत. गडद काळा सनग्लासेस त्याच्या व्यक्तिमत्त्वात आणखीनच भर घालत आहेत. दोघांनीही उबदार कपडे घातले असुन ते बर्फाच्या ठिकाणी पोज देत आहेत. 

गुरु रंधावाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्ही तुमच्यासोबत एकटे शेअर करण्यास उत्सुक आहोत. कपिल पाजीच्या पहिल्या गाण्याची संपूर्ण जग प्रतीक्षा करू शकत नाही. हे गाणे ९ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT