Kapil Sharma  Dainik Gomantak
मनोरंजन

Kapil Sharma Upcoming Movie : "मी 'कोकाकोला'मध्ये हेल्पर म्हणुन काम केलं आहे", कपिल शर्माने सांगितला संघर्षाचा काळ

अभिनेता कपिल शर्माने त्याच्या आयुष्यात केलेला संघर्ष उलगडून दाखवला आहे.

Rahul sadolikar

Kapil Sharma Upcoming Movie : आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना आणि सेलिब्रिटींना खळखळून हसवणाऱ्या कपिल शर्माने त्याच्या संघर्षाचा काळ सांगितला आहे. नंदिता दासचं दिग्दर्शन असलेला त्याचा आगामी चित्रपट झ्विगॅटो 17 मार्चला थिएटरमध्ये रिलीजसाठी सज्ज आहे. सध्या कपिल त्यात व्यस्त आहे. एका मुलाखती दरम्यान त्याने काही गोष्टी सांगितल्या आहेत.

या चित्रपटात फूड डिलिव्हरी एजंटची भूमीका करतोय. पण हे काम कपिलने त्याच्या आयुष्यात केलं आहे. कपिलने सांगितले की त्याने पुर्वी कोका कोला कंपनीमध्ये काम केल्याचं सांगितलं आहे.

झ्विगाटोमध्ये शहाना गोस्वामी कपिल शर्माची सहकलाकार आहे , कपिलची भूमीका एका फूड डिलीव्हरी एजंटची आहे ज्यात त्याचा आपल्या कुटुंबासाठी संघर्ष दाखवण्यात आला आहे. 

या भूमीकेबद्दल बोलताना कपिल म्हणतो,  “प्रामाणिकपणे, जर मला शास्त्रज्ञ, डॉक्टर किंवा बिझनेसमनची भूमिका ऑफर केली गेली असेल तर मला अस्वस्थ वाटले असेल. पण मी या जगातून आलो आहे. 

मी डिलिव्हरी बॉय म्हणून काम केलेले नाही, पण कोका-कोलामध्ये हेल्पर म्हणून काम केले आहे.” कपिल पुढे म्हणतो की हा चित्रपट, कामगार वर्गाचे शोषण कसे केले जाते हे अधोरेखित करताना, सहानुभूती आणि आदर यांचं ओझं न लादता पुढे नेतो.

नंदिता दास आणि कपिल शर्मा एकत्र येण्यानं अनेकांना आश्चर्य वाटत आहे. कपिल म्हणतो, चित्रपटात काम करणं विनोदी कार्यक्रमासारखेच नॅच्यूरल वाटले. “आपण दोघेही एकाच ग्रहावरचे माणसे आहोत. आम्ही समान भावना शेअर करतो,”

कपिल पुढे म्हणाला की. “हा चित्रपट बनवताना आम्ही दुसरे काही केले नाही. मी माझ्या शो 'द कपिल शर्मा शो' साठी बँक एपिसोड शूट केले जेणेकरून मला चित्रपटावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येईल.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT