Kangana Ranauat Dainik Gomantak
मनोरंजन

Kangana Ranauat: आता 'हा' तरी चित्रपट तारणार का कंगणाचे करीयर? नवाझुद्दीनसोबत झळकणार...

Kangana Ranauat: अवनीत बरोबर नवाजु़द्दीनदेखील मुख्य भूमिकेते दिसून येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Kangana Ranauat: बॉलीवूडची क्वीन कंगणा रनौतने तिचा बहुचर्चित चित्रपट 'टीकू वेड्स शेरू' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट 23 जूनला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमॅझोन प्राइमवर बघू शकणार आहेत.

आता या चित्रपटाचे पोस्टरदेखील रिलिज झाले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अवनीत कौर नवरीसारखी दिसत असून नवीजुद्दीन सिद्दकी हिरव्या रंगाच्या शेरवानी मध्ये दिसत आहे.

कंगणाने आपल्या चित्रपटाची प्रदर्शनाची घोषणा इंस्टाग्रामवर केली आहे. ही घोषणा करताना कंगणाने म्हटले आहे की - 'स्वत:ला सांभाळा, कारण टीकू आणि शेरु च्या प्रेम आणि स्वप्नांचा भव्य प्रवास सुरु झाला आहे.'

  • मुख्य भूमिकेत दिसणार अवनीत कौर आणि नवाजुद्दीन

टीकू वेड्स शेरु या चित्रपटात अवनीत कौर मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. अवनीत टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री असून 'अलादीन' या मालिकेत जास्मीनचे पात्रामुळे तिला घराघरात ओळख मिळाली होती.

अवनीत बरोबर नवाजु़द्दीनदेखील मुख्य भूमिकेते दिसून येणार आहे. या चित्रपटाचे निर्देशन साईं कबीरने केले आहे तर निर्माती म्हणून कंगणाने काम बघितले आहे. याबरोबरच हा चित्रपट मणिकर्णिका प्रोडक्शनअंतर्गत तयार झाला आहे.

  • कंगणाचा पहिला चित्रपट

प्रोड्यूसर म्हणून कंगणाचा हा पहिला चित्रपट आहे. याबाबत बोलताना कंगणाने म्हटले आहे की, मी या फेजमध्ये मी आनंदाने काम केले आहे. मला आशा आहे की, प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT