kangana ranaut 
मनोरंजन

'थलाईवी'साठी कंगनाने वाढवले तब्बल 'इतके' किलो वजन

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री कंगना रनौत आज तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त कंगनाने तिच्या चाहत्यांसाठी तिचा आगामी चित्रपट 'थलाईवी' चा ट्रेलर रिलीज केला. मुंबई आणि चेन्नई या दोन शहरांमध्ये थलाईवी चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. विशेष बाब म्हणजे कंगनाने या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यापूर्वीच चित्रपटातील तिचे काही फोटो आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर शेअर केले आहेत. यात ती खूपच जाड झाल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे कंगनाने जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी स्वतःहून तब्बल 20 किलो वजन वाढवले आहे. (Kangana Ranaut adds 20 kg weight for Thalaivi movie) 

कंगनाने (Kangana Ranaut) शेअर केलेल्या या फोटोजमध्ये तिचे वाढलेले वजन स्पष्टपणे दिसून येत आहे. कंगनाने यात नृत्यासाठी चमकदार सोनेरी रंगांचा पोशाख घातला आहे. तर दुसर्‍या फोटोत ती क्लीओपेट्रासारख्या पोशाखात उभी आहे. चित्रपटात जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी कंगनाने तिचे वजन वाढवले आहे. त्याचबरोबर, कंगना लवकरच ‘धाकड’ या आगामी चित्रपटात एजंट अग्निच्या भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोजमध्ये कंगना एक मशिनगन आणि एक पिस्तूल घेऊन सज्ज दिसत आहे. तर तिच्या मागच्या बाजूला गाडीची चाके जळताना दिसत आहे. धाकड हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट असणार असून यात अर्जुन रामपाल रुद्रवीर म्हणून भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनेश रझी घई यांनी केले असून येत्या 1 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. थलाईवी आणि धाकड व्यतिरिक्त कंगना तेजस या चित्रपटामध्येही दिसणार आहे.

दरम्यान, थलाईवीची रिलीज डेट 23 एप्रिल ठेवण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती विष्णू वर्धन इंदुरी, शैलेश आर सिंग आणि हितेश ठक्कर यांनी केली आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू भाषेत प्रदर्शित होईल. या चित्रपटात कंगनाशिवाय अरविंद स्वामीही एमजीआरच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'थलाईवी'चे दिग्दर्शन विजय यांनी केले असून, विजयेंद्र प्रसाद यांनी संगीतकार जी.व्ही. प्रकाश कुमार, आणि विष्णू वर्धन इंदुरी आणि शैलेश आर सिंह यांनी संयुक्तपणे निर्मिती केली आहे. आपल्या अभिनयाने आणि प्रेमाने तामिळनाडूच्या राजकारणाला नवी दिशा देणारी एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिवंगत नेत्या जयललिता यांच्या महान जीवनातील विलक्षण अनुभव या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

SCROLL FOR NEXT