कतरिना (Katrina Kaif) 'अग्निपथ' चित्रपटातील प्रसिद्ध आयकॉनिक डायलॉग 'नाम विजय दीनानाथ चौहान' बोलताना दिसते. Dainik Gomantak
मनोरंजन

KBC च्या सेटवर 'विजय दीनानाथ चौहान'ला कतरिनाची 'टशन'

बिग बी कतरिनासोबत (Katrina Kaif) हा डायलॉग त्यांच्या भारदस्त आवाजात बोलतानाही दिसत आहेत. त्यानंतर बिग बींनी तिचे कौतुक करत 'क्या बात है मॅम, मेरे पेट पे लाथ मारी'. अशी मिश्कील टिप्पणीही केली.

दैनिक गोमन्तक

'कौन बनेगा करोडपती'मध्ये (KBC) ज्यावेळी कोणतेही चित्रपट सेलिब्रिटी येतात तेव्हा प्रश्न-उत्तरांमध्येही वातावरण फिल्मी होऊन जाते. 'कौन बनेगा करोडपतीच्या आगामी दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये असेच फिल्मी वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे पुन्हा एकदा बॉलीवूडचा मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 'अग्निपथ' चित्रपटाचा आयकॉनिक डायलॉग त्याच्याच स्टाइलमध्ये बोलताना दिसणार आहे, पण यातला ट्विस्ट असा आहे की, बिग बी हे डायलॉग एकटे बोलणार नाहीत. त्यांना साथ देण्यास प्रतिभावान अभिनेत्री कतरिना कैफ देखील यावेळी असणार आहे. वास्तविक, कतरिना कैफ (Katrina Kaif), रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) या वीकेंडला 'कौन बनेगा करोडपती 13' च्या सेटवर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत. त्यामुळे यावेळी खूप धमाल पाहायला मिळणार आहे.

'नाम, विजय दीनानाथ चौहान'

शोच्या निर्मात्यांनी कौन बनेगा करोडपतीच्या आगामी दिवाळी स्पेशल एपिसोडचा प्रोमो रिलीज केला आहे. बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी स्वत: या एपिसोडचा प्रोमो त्यांच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कतरिना 'अग्निपथ' चित्रपटातील प्रसिद्ध आयकॉनिक डायलॉग 'नाम विजय दीनानाथ चौहान' बोलताना दिसत आहे. कतरिना संपूर्ण डायलॉग अमिताभ बच्चन यांच्या स्टाईलमध्ये रिपीट करत आहे. बिग बी कतरिनासोबत हा डायलॉग त्यांच्या भारदस्त आवाजात बोलतानाही दिसत आहेत. त्याचवेळी कतरिनाने या डायलॉगची एवढी ओळ बोलली की खुद्द अमिताभ बच्चनही तिची स्तुती केल्याशिवाय स्वतःला रोखू शकले नाहीत. या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हसत कतरिनाला सांगतात, 'क्या बात है मॅम, मेरे पेट पे लाथ मारी'.

हे व्हिडिओ शेअर करत अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, या संवादामध्ये केबीसी 13 चे मनोरंजन दुप्पट केले आहे. 'कौन बनेगा करोडपती'मध्ये हा मजेदार क्षण आपल्याला पहावयास मिळणार आहे. यासोबत बिग बींनी कतरिना कैफ, अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी यांनाही या पोस्टमध्ये टॅग केले. अमिताभ बच्चन आणि कतरिना कैफच्या या डायलॉग वॉरवर चाहत्यांच्या जबरदस्त प्रतिक्रिया येत आहेत. हे पाहून चाहते कतरिनाचे जबरदस्त परफॉर्मन्स म्हणून वर्णन करत आहेत, तर अमिताभ बच्चन यांच्या कॉमेंट बॉक्सवर ते लिहित आहेत, 'सर तुमच्यासारखा कोणी नाही'. एका चाहत्याने कमेंट बॉक्सवर लिहिले की, 'कतरिनाने या डायलॉगमध्ये बिग बींसोबत मोठ्या आवाजात आणि स्वॅगमध्ये स्पर्धा केली आहे'.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

SCROLL FOR NEXT