(Jubin Nautiyal Twitter
मनोरंजन

Indian Idolमधून रिजेक्ट झालेल्या गायकाच्या आवाजाचे लांखो तरूण फॅन

14 जून 1989 रोजी उत्तराखंडच्या डेहराडून शहरात जन्मलेल्या झुबिनचा प्रवास सोपा नव्हता.

दैनिक गोमन्तक

आज बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालचा वाढदिवस आहे. जुबिन नौटियाल आज 14 जून रोजी त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहेत. रिअॅलिटी शोमधून आलेला गायक जुबिन नौटियाल त्याच्या एमोशनल सॉंगसाठी ओळखला जातो. जुबिनने केवळ हिंदीतच नाही तर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 14 जून 1989 रोजी उत्तराखंडच्या डेहराडून शहरात जन्मलेल्या झुबिनचा प्रवास सोपा नव्हता. जुबिन नौटियाल यांनी बावरा मन आणि कुछ तो बता यांसारखी अनेक हिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत. (Jubin Nautiyal Birthday)

जुबिनला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती

जुबिन हा असा गायक आहे ज्याला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. त्याने लहानपणापासूनच संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. जुबिन नौटियालने डेहराडूनमधील त्यांच्या शाळेत संगीत हा विषय निवडला होता. त्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी गायक जुबिन नौटियालने त्यांच्याच शहरात लाइव्ह आणि चॅरिटीसाठी परफॉर्म करण्यास सुरुवात केली. आणि तो आपल्याच शहरातील एक प्रसिद्ध गायक बनला.

इंडियन आयडॉलमधून रिजेक्ट

इंडियन आयडॉल या शोमध्ये जुबिन नौटियालला रिजेक्ट करण्यात आले होते. जुबिन नौटियाल या शोमध्ये स्पर्धक म्हणून आला होता आणि तो रिजेक्ट झाला. मात्र त्यानंतरही त्याने हिंमत हारली नाही. त्यानंतर त्याने आणखी एका रिअॅलिटी शोमध्ये म्हणजेच 'एक्स-फॅक्टर'मध्ये गाण्याचा प्रयत्न केला. येथे जुबिन नौटियाल टॉप 25 मध्ये पोहोचला. 2014 मध्ये आलेल्या सोनाली केबल या चित्रपटातून त्याने आपल्या नशिबाचे दरवाजे उघडले. जुबिन नौटियालने अखेर सोनाली केबल चित्रपटातील एक मुलाकात या गाण्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून हा त्याच्या गाण्याचा ताफा सुरू झाला आणि तरूणांच्या मनावर राज्य करू लागला.

संगीतकार ए आर रहमान यांनी सल्ला दिला

जुबिनने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'मी त्यावेळी फक्त 18 वर्षांचा होतो. रहमान सर एका रिअॅलिटी शोला जज करण्यासाठी आले होते. ही बातमी समजताच मी त्यांना भेटायला सेटवर गेलो. जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी मला माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा सल्ला दिला. त्यांनी मला सांगितले की, मुंबईने नेहमीच टॅलेंटवर प्रभाव टाकला आहे. टॅलेंटला वाव दिला आहे. तुमच्या आवाजात मूळ गुणवत्ता आणि काही खास वैशिष्ट्य आहे, तेव्हा प्रयत्न करत रहा. आणखी मोठी संधी मिळवण्यासाठी 2-3 वर्षे प्रतीक्षा करा.असा सल्ला मला रहमान सरांनी तेव्हा दिला होता. जो माझ्या आजही लक्षात आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT