Jr NTR Instagram
मनोरंजन

Jr NTR Birthday: रामा राव ज्युनियर करोडोंच्या संपत्तीचा मालक

Jr NTR Net Worth: दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया खास गोष्टी.

दैनिक गोमन्तक

ज्युनियर एनटीआर हा साऊथचा सुपरस्टार आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. प्रत्येक भूमिकेत त्याने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. केवळ दक्षिणेतच नाही तर बॉलिवूडमध्येही त्याचे फॅन फॉलोइंग प्रचंड आहेत. याच कारणामुळे चाहत्यांमध्ये त्याच्या चित्रपटांची क्रेझ आहे आणि म्हणूनच तो आज सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तो चित्रपटांसोबतच (Movie) जाहिरातींमधूनही कमाई करतो. आज आम्ही तुम्हाला ज्युनियर एनटीआरच्या नेट वर्थबद्दल सांगणार आहोत. (Jr NTR Birthday Special News)

मिळालेल्या माहितीनुसार Jr NTR ची एकूण संपत्ती 400 कोटी आहे. त्यांचे मासिक उत्पन्न 3 कोटींहून अधिक आहे. तर वार्षिक कमाई 36 कोटींहून अधिक आहे. तसे, ज्युनियर एनटीआर कमावलेल्या रकमेनुसार, तो इन्कम टॅक्स देखील वेळेवर भरतो. यासोबतच तो सामाजिक कार्यही करतो.

* घर

ज्युनियर एनटीआर याचे हैदराबादमधील जुबली हिल्समध्ये 28 कोटींचे घर आहे. नुकतेच त्याने बंगळुरूमध्ये एक घर देखील खरेदी केले आहे. याशिवाय त्याच्याकडे अनेक प्रॉपर्टी आहेत पण त्यांच्याबद्दल अधिक माहिती नाही.

* गाड्या

ज्युनियर एनटीआरकडे रोल्स रॉयस आणि रेंज रोव्हर सारखी वाहने आहेत. त्यांची किंमत 1 ते 3 कोटी आहे. ज्युनियर एनटीआरने 1991 मध्ये करिअरची सुरुवात केली होती. तेव्हापासून त्याने हिट चित्रपट देण्यास सुरुवात केली. आरआरआर (RRR) या चित्रपटामध्ये त्याने जबरदस्त भूमिका पार पाडली. या चित्रपटात त्यांच्यासोबत राम चरण मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि आलिया भट्टने कॅमिओ केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; आमदारांची अशीही ‘गटारी’

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT