Dilip Borkar Dainik Gomantak
मनोरंजन

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

Goa IFFI 2024: गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आणि नंतर त्याच्या पुनरुत्थानासाठी आपले आयुष्य झिजवून ज्यांनी गोवा घडवला त्यांची दखल घ्यायची सोडा, साधे स्मरणही आजपर्यंत इफ्फीत झालेले नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

दिलीप बोरकर

अभिनेते नागार्जुन ‘इफ्फी’तील ‘भारत है हम’ अंतर्गत ५२ अनिमेशन फिल्मच्या उद्‍घाटन प्रसंगी म्हणाले, ‘इफ्फी’त मी वडिलांना मानवंदना देण्यासाठी आलोय...आमच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांचे स्मरण ठेवणे, त्यांच्याबाबत माहिती देणे गरजेचे आहे..’ पण अशा प्रकारच्या भावनांची गोमंतकीयांना कदर आहे का?

गेली २३ वर्षे गोव्यात जल्लोषात सादर होणाऱ्या इफ्फीच्या एकाही आवृत्तीत अशा प्रकारच्या भावनांचा विचार ना आयोजकांनी केला, ना गोवा सरकारने. गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आणि नंतर त्याच्या पुनरुत्थानासाठी आपले आयुष्य झिजवून ज्यांनी गोवा घडवला त्यांची दखल घ्यायची सोडा, साधे स्मरणही आजपर्यंत इफ्फीत झालेले नाही.

रवीन्द्र केळेकर हे थोर गांधीवादी स्कॉलर आहेत. त्यांना गांधीवादी विचारवंत म्हणून देशात मान्यता आहे. रवीन्द्र केळेकर यांनी गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलेले आहे, गोव्याचे विलिनीकरण होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत रान उठवून गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व जपले आहे.

कोकणी भाषेला एक स्वतंत्र भारतीय भाषा म्हणून साहित्य अकादमीची मान्यता मिळवून देण्याबरोबरच गोव्याची राजभाषा, तिचा संविधानाच्या आठव्या परिशिष्टात समावेश, गोव्याचे घटकराज्य अशा प्रकारच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते, ज्याची फळे आज आम्ही चाखतो आहोत. अशा महान गोमंतकीय विभूतींचे कार्य येणाऱ्या पिढीसमोर ठेवण्याची गरज आहे.

केळेकर यांच्या सहवासात आलेल्या दिग्गज विभूतींचे त्याच्या विषयींची मतं मी रिकॉर्ड करून ठेवत होतो. त्यासाठी आधुनिक कॅमेरा खरेदी करून तो हाताळणे  शिकलो. मंगेश पाडगावकर, गुलजार, अशा दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या. त्या जपल्या.

रवीन्द्र केळेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान सोहळ्यापासून त्यांच्या अंतिम निर्वाण सोहळ्यापर्यंत कित्येक गोष्टी कॅमेऱ्यात बंदिस्त केल्या. पण त्यांचे रुपांतर माहितीपटात करण्याचे धाडस होत नव्हते. जेव्हा केळेकर यांची  जन्मशताब्दी जवळ येत असल्याची कल्पना आली, तेव्हा विचार केला आता नाही तर कधीच नाही. माझा मित्र साईनाथ परब यांच्याशी बोललो. तो एक या क्षेत्रातील क्रिएटीव्ह माणूस.

त्याला मी उधारीवर हे काम करण्याची गळ घातली. तो तयार झाला. गेले वर्षभर आम्ही धडपडलो. पण पैशाचे सोंग काही जमेना. शेवटी कळंगुटचे आमदार माझे मित्र मायकल लोबोंना म्हटलं, त्यांनी पटकन म्हटलं, ‘मी तुझ्या सोबत आहे. एका महान गोमंतकीयाची ओळख जगाला होऊ दे’, आणि शेवटी हा माहितीपट पूर्ण झाला. केळेकर यांच्या जन्मशताब्दी काळात होणाऱ्या ‘इफ्फी’त या माहितीपटाचा प्रीमियर होणे, हे माझी स्वप्नपूर्तीच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

Goa Mangroves: 'खारफुटी हटवा, खाजन वाचवा'! गोवा फाऊंडेशन कोर्टात, पंचायतींकडून पत्रे; का आलीय शेती संकटात? वाचा..

Kala Academy: '..पुन्हा छताचा तुकडा कोसळला'! कला अकादमीला समस्यांचे ग्रहण; 60 कोटींच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

Illegal Houses Goa: एक लाख घरे होणार कायदेशीर? केवळ मालकी हक्क नसलेली घरे ‘बेकायदेशीर’ म्हणून गणली जाणार का!

Rashi Bhavishya 27 July 2025: कौटुंबिक प्रश्न सुटतील,खर्चावर नियंत्रण आवश्यक; आरोग्याची काळजी घ्या

SCROLL FOR NEXT