Jaya Bachchan -Navya  Dainik Gomantak
मनोरंजन

Jaya Bachchan: 'ती तर माझ्यासाठी तिरस्काराची गोष्ट...' जया बच्चन यांनी सांगितला नात्यातील रेड फ्लॅग

Jaya Bachchan: कारण त्यांनी आधीच माफी मागितली आहे.

दैनिक गोमन्तक

Jaya Bachchan: बॉलीवूडचे बीग बी अभिताभ बच्चन यांची नात नव्या आपल्या चॅट शो मुळे मोठ्या चर्चेत असते. What the hell Navya या चॅट शोच्या दुसऱ्या सीझनचा दुसरा भाग आता रिलीज झाला आहे. यामध्ये आपली आजी जया बच्चन आणि आई श्वेता नंदा यांच्याबरोबर तिने गप्पा मारल्या आहेत. या गप्पांचा मुख्य विषय प्रेम हे होते.

नव्याने यावेळी नात्यातील तुमच्या अनुसार रेड फ्लॅग कोणते आहेत? असा प्रश्न विचारला होता. त्यावर जया बच्चन यांनी अरे-तुरे बोलणे, आदर न ठेवणे किंवा समोरच्या व्यक्तीला वाईट वागणूक देणे हा माझ्यासाठी रेड फ्लॅग असल्याचे सांगितले आहे.

त्या म्हणतात- 'माझ्यासाठी समोरच्या व्यक्तीला तू असं एकेरी बोलणे ही तिरस्काराची गोष्ट आहे. नात्यात व्यक्तीला वाईट वागणूक देणे हा माझ्यासाठी रेड फ्लॅग आहे. मी तुझ्या आजोबांबरोबर ( अमिताभ बच्चन ) कधीही असे बोलल्याचे तुला आठवते का? माझ्यासाठी ही खूप अपमानजनक बाब आहे.' असे जया बच्चन यांनी म्हटले आहे.

तर श्वेता नंदा यांच्या म्हणण्यानुसार, नात्यात कोणत्याही प्रकारची हिंसा असणे हाच रेड फ्लॅग आहे. ही हिंसा शाब्दिक किंवा शारिरक असू शकते. जर एखाद्या जोडीदाराने सांगितले की त्यांना अमुक अमुक गोष्टींचा त्रास होत असेल तर त्या गोष्टी परत परत केल्या नाही पाहिजेत. त्या पुढे म्हणतात- जर त्यांनी सॉरी म्हटले तर भांडण लांबवू नका, कारण त्यांनी आधीच माफी मागितली आहे.

याबरोबच ,नव्याने स्त्रीयांच्या समाजातील भूमिकेबद्दलही लक्ष वेधले आहे. जगाने खूप प्रगती केली आहे पण असे असूनही आजच्या काळात स्त्रीला अविवाहित राहणे खूप अवघड आहे. यावर श्वेताने म्हटले आहे की, लोकांना वाटते की एखाद्या महिलेचा उद्देश फक्त मुले जन्माला घालणे आहे, त्यामुळे तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव असतो.

समाजाची रचना अशा प्रकारे केली आहे की पुरुषांसाठी एकटे राहणे ठीक आहे, परंतु महिलांसाठी ते इतके सोपे नाही. कधीही घाईत लग्न करू नका आणि जेव्हा तुम्ही भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असाल तेव्हाच मुले होऊ द्या. यावर जया बच्चन म्हणाल्या, 'आजकाल अनेक जोडपी मूल न होण्याचा पर्याय निवडतात, जो योग्यही आहे.'

दरम्यान, जया बच्चन आपल्या गंभीर स्वभावासाठी ओळखल्या जातात. अनेकदा त्या आपल्या वागण्यामुळेदेखील चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यामधील संबंध बिघडल्याचेदेखील म्हटले जात होते. मात्र ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांनी यावर कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोलवाळमध्ये टॅक्सी चालकांची गर्दी! मोपा विमानतळावरील 'वसुली' विरोधात आंदोलन; 210 रुपये शुल्कामुळे संतापाची लाट

Dhirio in Colva: सुरावलीत पुन्हा धीरियोचा थरार, पोलिसांकडून FIR दाखल; Viral Video वरुन चर्चा..

Savoi Verem: झुळझुळ वाहणारे शीतल झरे, बागायतींनी नटलेला परिसर; मांडवीच्या कडेवर वसलेला गाव 'सावईवेरे'

Goa History: ‘पोर्तुगिजांनो चालते व्हा'! डॉ. गायतोंड्यांना अटक केली, 17 फेब्रुवारी 1955ला अनेक सत्याग्रही म्हापशाला जमा झाले..

Nightclubs In Goa: गोवेकरांना मारक ठरू शकणारे 'नाइटक्लबांचे जाळे' तोडून टाकावेच; गोव्याचे अनिष्ट गोष्टीपासून रक्षण करावे..

SCROLL FOR NEXT