Rajanikanth movie Jailor  Dainik Gomantak
मनोरंजन

Jailor Movie Release: थलैवा रजनीकांतचा 'जेलर'ठरला भारी! पहिल्याच दिवशी नोंदवला 'हा' विक्रम

गोमंतक ऑनलाईन टीम

Jailor Movie Release first day collection: रजनीकांत स्टारर 'जेलर' या चित्रपटाला गुरुवारी जबरदस्त ओपनिंग मिळाली. एका रिपोर्टनुसार, या चित्रपटाने भारतात जवळपास 52 कोटी रूपयांची कमाई केली आहे.

जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या चित्रपटाने सुट्टी नसलेल्या दिवशी रिलीज होऊनही पहिल्याच दिवशी सुमारे ₹ 72 कोटींची कमाई केली आहे. यासह, हा चित्रपट 2023 मध्ये ओपनिंग डे वर आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट बनला आहे.

आतापर्यंत हा विक्रम दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पोन्नियन सेलवन-2 या चित्रपटाच्या नावावर होता. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जवळपास ₹ 32 कोटी रूपयांची कमाई केली होती.

कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि तेलगू भाषेत प्रदर्शित झाला आहे. सर्व भाषांबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपटाने भारतात निव्वळ ₹ 44.50 कोटींचे कलेक्शन केले आहे.

निव्वळ संकलनात कर आणि वितरक शुल्क समाविष्ट नाही. चित्रपटाने तामिळनाडूमध्ये सर्वाधिक ₹ 23 कोटी, कर्नाटकमध्ये ₹ 11 कोटी, केरळमध्ये सुमारे 5 कोटी, आंध्र प्रदेशमध्ये 10 कोटी आणि तेलंगणा आणि उर्वरित राज्यांतून ₹ 3 कोटींचे संकलन केले आहे.

तमिळनाडू आणि केरळमध्ये रिलीजच्या पहिल्या दिवशी 2023 मधील सर्वात मोठे ओपनिंग या चित्रपटाला मिळाले आहे. पहिल्या दिवशी बंपर ओपनिंग मिळालेला कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये प्रदर्शित होणारा जेलर हा पहिला तमिळ चित्रपट आहे.

यूएसमध्ये ₹ 11.9 कोटींची कमाई

परदेशातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्यापार विश्लेषक रमेश बाला यांच्या मते, चित्रपटाने यूएसमध्ये अंदाजे 11.9 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा आकडा सुपरस्टार विजयच्या वारिसू या चित्रपटाच्या कलेक्शनपेक्षा जास्त आहे. वारिसूने अमेरिकेत एकूण 9.43 कोटींची कमाई केली होती.

दिग्दर्शक नेल्सनच्या जेलर या चित्रपटात रजनीकांत टायगर मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत आहे. आपल्या लीडरला तुरूंगातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या गँगला रोखणारा जेलर रजनीकांतने यात साकारला आहे. या चित्रपटात रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन, योगी बाबू, मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ यांच्याही भूमिका आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT